एक्स्प्लोर
लोकल थांबवून मोटरमनची लघुशंका, व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल
उल्हासनगर रेल्वे स्थानकातून मुंबईकडे जाणारी लोकल श्रीराम चौकाच्या उड्डाणपुलाजवळ अचानक काही कारण नसताना थांबली. लोकल थांबताच मोटरमन लोकलमधून उतरला. अगदी लोकलसमोरच त्याने लघुशंका केली आणि पुन्हा आपल्या केबीनमध्ये बसून लोकल पुढे नेली.
![लोकल थांबवून मोटरमनची लघुशंका, व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल Mumbai : Central Railway local motorman jumps off halted train to pee on railway track लोकल थांबवून मोटरमनची लघुशंका, व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/07/18074117/Mumbai-Local-Motorman-Pee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कल्याण : मोटरमनने लोकल थांबवून रुळावर लघुशंका केल्याच्या घटनेची चर्चा सध्या रंगत आहे. मुंबईत मध्य रेल्वेवरील उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकांदरम्यान काल घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. हे नैसर्गिक कृत्य असल्याने कारवाईची तरतूद नसल्याची भूमिका रेल्वेने घेतली आहे.
उल्हासनगर रेल्वे स्थानकातून मुंबईकडे जाणारी लोकल काल दुपारी अडीच वाजताच्या सुमारास रवाना झाली. मात्र श्रीराम चौकाच्या उड्डाणपुलाजवळ ही लोकल अचानक काही कारण नसताना थांबली. त्यामुळे बाहेर लोंबकळणाऱ्या प्रवाशांना सिग्नल नसतानाही लोकल थांबल्याचं काहीसं आश्चर्य वाटलं.
लोकल थांबताच मोटरमन लोकलमधून उतरला. अगदी लोकलसमोरच त्याने लघुशंका केली आणि पुन्हा आपल्या केबीनमध्ये बसून लोकल पुढे नेली. विशेष म्हणजे, या सगळ्या प्रकाराबाबत लोकलमधील प्रवाशांनी काहीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे या गोष्टीचा बाऊ करण्याची गरजच नव्हती.
ही लहानशी गोष्ट कधी समोरही आली नसती, पण हा सगळा प्रकार तिथे असलेले स्थानिक पत्रकार सोनू शिंदे यांनी कॅमेरात कैद केला आणि हा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला. सोशल मीडियावरही याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोणी मोटरमनच्या नावे शिव्या घालत आहे. तर, हे कृत्य निर्लज्जपणाचं असल्याची टीका काही जण करत आहेत.
अचानक लोकल थांबवल्याने अपघाताला निमंत्रण मिळालं असतं, अशी भीती कोणी बोलून दाखवत आहे, तर लोकलला उशीर होऊन रेल्वेचं वेळापत्रक कोलमडण्याची चिन्हं कोणाला दिसत आहेत.
दुसरीकडे, दोन तासांच्या लोकल प्रवासभर लघुशंका रोखून धरणं चुकीचं असल्याचं मत काही जणांनी व्यक्त केलं आहे. संबंधित मोटरमनला आरोग्यविषयक तक्रार असल्याची शक्यताही कोणी बोलून दाखवली आहे. तर काही जणांनी रेल्वे स्थानकावर गाडी थांबवून लघुशंका उरकता आली असती, असा पर्याय सुचवला आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांना याबाबत विचारलं असता, ही नैसर्गिक क्रिया असून मोटरमनच्या केबिनमध्ये प्रसाधनगृह नसते. त्यामुळे त्यांना याशिवाय पर्याय नसल्याचं ते म्हणाले. मोटरमन हादेखील शेवटी एक माणूसच आहे. त्यामुळे या घटनेबाबत माणूसकीच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे, असंही आवाहन ए. के. सिंग यांनी केलं.मुम्बई, EMU मोटरमैन की शर्मनाक हरकत ,लोकल ट्रेन रोककर किया टॉयलेट । उल्हासनगर और विठ्ठलवाडी स्टेशन के बीच ट्रैक पर उतरकर मोटरमैन के टॉयलेट करने की तस्वीरें वायरल। कारण मेडिकल हालात हो सकता है। @abpnewshindi@sansaniABP@abpmajhatv @Central_Railway @RailMinIndia @PiyushGoyal pic.twitter.com/ArOETnj6Hv
— Mrityunjay Singh मृत्युंजय सिंह 🇮🇳 (@MrityunjayNews) July 17, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)