मोठी बातमी : करीरोड आता लालबाग, कॉटन ग्रीन नव्हे काळाचौकी, सॅण्डहर्स्ट रोडचं डोंगरी; मुंबईतील 7 रेल्वे स्थानकांची नावे बदलणार
Mumbai News : करीरोड, मरीन लाइन्स, कॉटन ग्रीन यासह मुंबईतल सात रेल्वे स्थानकांची इंग्रजी नावं बदलण्यात येणार आहेत.
मुंबई : मुंबईतील सात रेल्वे स्थानकांची नावे बदलणार आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांनी ब्रिटीशकालीन इंग्रजी नावे बदलण्याची मागणी अनेक काळापासून सुरु होती. अखेरही मागणी मंजूर झाली आहे. त्यामुळे मुंबईतील सात रेल्वे स्थानकांनी इंग्रजी नाव बदलण्यात येणार आहेत. मुंबईतल्या सात रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा ठराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत मांडला. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता आठ रेल्वे स्टेशनांची इंग्रजी ओळख पुसणार आहे. करीरोड, मरीन लाइन्स, कॉटन ग्रीन, चर्नी रोड अशी इंग्रजी नावं जाऊन या रेल्वे स्थानकांची आता मराठी नावं येणार आहे.
मुंबईतील 7 रेल्वे स्थानकांची नावे बदलणार
मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नाव बदलण्याचा प्रस्ताव विधानपरषदेत मंजूर झाला आहे. यामुळे शासन निर्णयानंतर लवकरच करीरोड, सॅण्डर्हस्ट रोड, मरीन लाईन्स, चर्नीरोडसह आठ स्थानकांची नावं बदलणार आहेत. मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा ठराव आज विधानसभेत मांडण्यात आल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली आहे. आठ रेल्वे स्थानकांची नाव बदलणार असून त्यांची नवीन नावं कशी असणार आहेत, ते जाणून घ्या.
मुंबईतल्या रेल्वे स्थानकांनी मराठी नावं कशी असणार?
- करी रोड : लालबाग रेल्वे स्थानक
- सँन्डहर्सड रोड : डोंगरी रेल्वे स्थानक
- मरीन लाईन्स : मुंबादेवी रेल्वे स्थानक
- चर्नी रोड रेल्वे स्थानक : गिरगांव रेल्वे स्थानक
- कॉटन ग्रीन : काळा चौकी रेल्वे स्थानक
- डॉकयार्ड रोड : माझगाव रेल्वे स्थानक
- किंग्ज सर्कल : तिर्थंकर पार्श्वनाथ
याप्रमाणे करी रोड, सँन्डहर्सड रोड, मरीन लाईन्स, चर्नी रोड, कॉटन ग्रीन, डॉकयार्ड रोड, सँन्डहर्सड रोड, किंग्ज सर्कल या रेल्वे स्थानकाच्या नावात बदल करण्यात येणार आहेत.