एक्स्प्लोर

BMC budget 2021-22 | मुंबई महानगरपालिका शाळांची नावं बदलणार; महापालिकेच्या अर्थसंकल्पात शैक्षणिक विकासासाठी विशेष तरतुदी

BMC budget 2021-22 : मुंबई महापालिकेचा 2021-2022 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. यावेळी पालिकेच्या शाळांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

BMC budget 2021-22 : आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज महापालिकेत सादर करण्यात आला आहे. मुंबई महापालिका सहआयुक्त रमेश पवार यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सन 2021-22 चे अर्थसंकल्पीय अंदाज शिक्षण समितीस बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृहात शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला.

शिक्षण विभागासाठी यंदा 2945.78 कोटींची तरतूद शिक्षण विभागासाठी करण्यात आली असून तितक्याच उत्पन्नाची अपेक्षा आहे. मागच्या वर्षी 2944.59 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यावेळी त्यात 1.19 कोटींची वाढ करण्यात आली आहे. मात्र महापालिकेच्या शिक्षण बजेटमध्ये नाविण्याचा अभाव दिसतोय. केवळ नव्या सिबीएसई शाळांसाठी नवी तरतूद करण्यात आली आहे. विशेष नवे प्रकल्प आणि योजनांऐवजी महापालिका शाळांचं नवं नामकरण आणि लोगो बदलण्यावरच भर या अर्थसंकल्पात देण्यात आला आहे. तसेच, नाव आणि लोगो बदलल्यानं महापालिका शाळांचा दर्जा बदलणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे 'मुंबई पब्लिक स्कुल' असं नामकरण करून नवीन बोधचिन्ह दिलं जाणार आहे. जनतेत सकारात्मक दृष्टिकोन व्हावा याकरिता ही योजना आखण्यात आली आहे. यात प्राथमिक विभागाच्या 963 आणि माध्यमिक विभागाच्या 224 मनपा शाळांच्या मूळ नावासह मुंबई पब्लिक स्कूल करण्यात आली असून त्याचा वापर सर्व शाळांसाठी करण्यात येणार आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पातील विशेष तरतुदी :

  • कोविड आरोग्य विषयक संसाधनांसाठी पुरवठा केला जाणार आहे. यासाठी 15.90 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हँड सॅनिटायझर, साबण, हँड वॉश पुरवले जाणार आहेत.
  • उच्च माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर काउन्सिलिंग कार्यक्रम Whatsapp आणि Chat bot द्वारे राबवणार. वैय्यक्तिक मार्गदर्शनासाठी मे 2021 पासून 'करिअर टेन लॅब' या संस्थेमार्फत नियोजन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रीया पार पाडण्याकरता मार्गदर्शन केलं जाईल. यासाठी तब्बल 21.10 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
  • CBSC बोर्डाच्या 2 शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. आता मुंबई शहरात 2, पश्चिम उपनगरांत 3, पूर्व उपनगरांत 5, अशा मिळून 10 शाळा, ज्युनियर केजी ते 6वी पर्यंत सुरु होतील. त्यासाठी 2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • मुंबई महापालिकेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या 27 शालेय वस्तूंसाठी 88 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • 25 माध्यमिक शाळांमध्ये टिकरिंग लॅब, विचारशील प्रयोगशाळा सुरु होणार. यात विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक साहित्याची मांडणी करुन प्रयोग करु शकतील. यासाठी 5.30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • संगीततज्ज्ञ मयुरेश पै यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एम. जोशी मार्गमहापालिका शाळेत "मॉडेल संगीत केंद्र" उभारणार. यात स्मार्ट टिव्ही, प्रोजेक्टर, क्रोम कास्ट, वायफाय या सेवा पुरवल्या जातील, त्यासाठी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • महापालिका शाळेतील 1300 वर्गखोल्या डिजीटल क्लासरुम होणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात 28.58 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?Milind Narvekar Special Report : Uddhav Thackeray यांचा शिलेदार मैदानात,मिलिंद नार्वेकर आमदार होणार?Ambadas Danve Suspension Special Report : शिवीगाळ, राजकारण ते निलंबन; दानवे-लाड प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget