मुंबई भाजपचे उपाध्यक्ष कृष्णा हेगडे यांच्या हाती शिवबंधन!
मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी भाजपला रामराम करुन आज शिवसेनेत प्रवेश केला.
मुंबई : मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी भाजपला रामराम करुन हाती शिवबंधन बांधलं आहे. कृष्णा हेगडे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधलं. 2022 मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृष्णा हेगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं म्हटलं जात आहे.
कृष्णा हेगडे हे मूळचे काँग्रेसचे आहेत. 2009 मध्ये विलेपार्ले मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि जिंकले देतील. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराग अळवणी यांनी त्यांचा पराभव केला. ते प्रिया दत्त यांच्या विश्वासातील होते. परंतु तत्कालीन मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्याशी वाद झाल्यानंतर त्यांनी 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
कृष्णा हेगडे यांची कारकीर्द 2009 मध्ये विलेपार्ले मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार 2014 साली भाजपच्या पराग अळवणी यांच्याकडून हेगडेंचा पराभव 2017 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश 5 फेब्रुवारी 2021 रोजी भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश
दरम्यान 2019 मधील विधानसभा निवडणुकीतील मनसेच्या उमेदवार जुईली शेंडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी हातात शिवबंधन बाधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेने विलेपार्ल्यात भाजप आणि मनसेला डबल धक्का दिल्याचं म्हटलं जात आहे.
विले पार्ल्याचे माजी आमदार कृष्णा हेगडे जी आणि २०१९ च्या विले पार्ले विधानसभेतील मनसेच्या उमेदवार जुईली शेंडे जी यांनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/q4JBvqJYXa
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) February 5, 2021