एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कुर्ल्यात बेस्ट बस मागे घेताना अपघात, तरुणीचा चिरडून मृत्यू
मात्र त्याचवेळी एका बसने रिव्हर्स घेतल्याने ती बसखाली चिरडली गेली. मागेही बस असल्याने तिला बाजूला होता आलं नाही.
मुंबई : कुर्ला बस डेपोमध्ये दोन बेस्ट बसमध्ये चिरडून एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. डेपोमध्ये दोन बस एकामागोमाग उभ्या होत्या. त्यापैकी बस मागे घेताना टायरखाली चिरडल्याने अमरीन सबा मूर्तिजा शेख या 22 वर्षीय तरुणीने प्राण गमावले.
कुर्ला डेपोमध्ये आज सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. एकामागोमाग उभ्या असलेल्या दोन बसच्या मधून मूर्तिजा शेख जात होती. मात्र त्याचवेळी एका बसने रिव्हर्स घेतल्याने ती बसखाली चिरडली गेली. मागेही बस असल्याने तिला बाजूला होता आलं नाही. जखमी अवस्थेत तिला जवळील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
अमरीन सबा मूर्तिजा शेख ही बँक कर्मचारी होती. वांद्रे कुर्ला संकुलात ती काम करत असलेली बँक आहे. दरम्यान, पोलिसांनी बेस्ट बसच्या चालकाला ताब्यात घेतलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
निवडणूक
Advertisement