एक्स्प्लोर
मुंबई विमानतळाकडून सर्वाधिक वर्दळीचा स्वतःचाच विक्रम मोडित
मुंबई विमानतळावर दर तासाला सरासरी 48 विमानांची ये-जा होते.
मुंबई : सर्वाधिक वर्दळ असलेला रनवे ठरण्याचा स्वतःचाच विक्रम मुंबई विमानतळाने मोडित काढला आहे. 20 जानेवारीला 24 तासांमध्ये 980 विमानांची ये-जा मुंबई विमानतळावरील रनवेवर झाली.
यापूर्वी 6 डिसेंबर रोजी मुंबई विमानतळावर 24 तासांमध्ये 974 विमानांची ये-जा झाली होती. त्यानंतर दीड महिन्यातच आधीच्या विक्रमाच्या तुलनेत अधिक सहा विमानांची ये-जा करुन मुंबई विमानतळाने नवे आकडे रचले.
मुंबईत जागेची कमतरता आहे. तर इंग्लंडमध्ये जगातील सर्वाधिक गजबजलेलं हिथ्रो (लंडन) एअरपोर्ट, गॅटविक एअरपोर्ट, स्टॅन्स्टेड एअरपोर्ट आणि ल्यूटन एअरपोर्ट ही चार विमानतळं आहेत. हिथ्रोमध्ये एकाच वेळी उपयोगात येणारे अनेक रनवे आहेत, मुंबईत मात्र एकच रनवे आहे.
दर तासाला 55 एअर ट्रॅफिक कंट्रोल करण्याची लंडनमधील गॅटविक विमानतळाची क्षमता आहे, तर मुंबईची एटीसी क्षमता 52 इतकी आहे. मात्र मुंबई विमानतळावर खूपच कमी वेळा एका तासाला 52 विमानांचं नियंत्रण केलं गेलं आहे.
दुसरीकडे, गॅटविक सिंगल रनवेची उन्हाळ्याच्या दिवसात रोज विमानं ये-जा करण्याची क्षमता 870 आहे. गॅटविक विमानतळावर पहाटे पाच वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 19 तास विमानं येत असतात. तर मुंबई विमानतळावर 24 तास विमानांची ये-जा सुरुच असते.
मुंबईत सकाळी सहा ते दहा, दुपारी 1.50 ते 3 आणि संध्याकाळी 7.50 नंतर मोठ्या प्रमाणात विमाने येतात. दर तासाला सरासरी 48 विमानांची ये-जा होते.
मुंबईत येणाऱ्या विमानांसाठी एक मुख्य रनवे आणि एक छोटा रनवे आहे. मात्र छोट्या रनवेवर एका तासात फक्त एक किंवा दोन विमानं नियंत्रित करता येतात.
जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आणि मुख्य रनवे बंद करावा लागला तर, मुंबई एअरपोर्टमध्ये विमानांची ये-जा जवळपास बंद होते. मुंबईहून विमानांची उड्डाणं नेहमीच विलंबाने होतात आणि येणाऱ्या विमानांना अनेक मिनिटं आकाशात घिरट्या घालत राहावं लागतं. त्यामुळे प्रवाशांना उशीर होतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement