Mumbai Air Pollution: मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरलाय, निर्देशांक 300 पार; मुंबईकर त्रस्त
Mumbai Air Pollution : प्रदूषणामुळं मुंबईकरांचा श्वास गुदमरला आहे. मुंबईत हवेची पातळी घसरली आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
Mumbai Air Pollution : गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा (Mumbai Air quality) बिघडल्याचे चित्र आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत चालली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईची हवा अत्यंत खराब पातळीपर्यंतही पोहोचली होती. आता पुन्हा त्याच धोक्याच्या पातळीवर मुंबईची हवा आली आहे. त्यामुळं मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे. वाढत्या प्रदुषणामुळं मुंबईतील हवेची गुणवत्ता निर्देशांक 300 पार गेला आहे.
मुंबईतील हवेची (Mumbai Air Pollution) गुणवत्ता बिघडली आहे. वाढत्या प्रदुषणामुळं मुंबईतील हवेची गुणवत्ता निर्देशांक 300 पार तर नवी मुंबईतही हवा गुणवत्ता निर्देशांक 342 अतिशय वाईट पातळीच्या जवळ पोहोचला आहे. मुंबई शहराचा एक्यूआय 303 वर अतिशय वाईट स्थितीत गेला आहे. तर मालाडमध्ये एक्यूआय 316 तर माझगावचा एक्यूआय 300 वरून वाईट अत्यंत खराब' पातळीच्या जवळ पोहोचली आहे. बीकेसीचा एक्यूआय 307, चेंबुरचा 319 तर अंधेरीत 339 वर गेला आहे.
मुंबईतील हवेची गुणवत्ता सध्या अतिखराब वर्गात पोहोचली आहे. या परिस्थितीमुळं मुंबईकरांना सध्या खोकल्याचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे सध्याच्या काळात खासकरून श्वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच मास्कचा वापर करणं फायद्याचं ठरेल. सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. श्वसनाचे विकार असलेल्यांना अधिक धोका, मास्क (Mask) वापरण्याचा सल्ला दिला आहे. नववर्षाचं स्वागत आतिषबाजीनं झाल्यास हवा गुणवत्ता पातळी आणखी खालवण्याची शक्यता आहे. वातावरणात पीएम 2.5 ची मात्रा अधिक असल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. मुंबईत सुरु असलेली बांधकामे, मुंबईच्या समुद्राजवळील मोठी जहाजे, कार्गोज सोबतच वाहतूक कोंडी, उडणाऱ्या धुळीमुळे प्रदूषणाची (Pollution) पातळी वाढल्याचा परिणाम आहे.
मुंबई शहरातील (Mumbai News) हवेच्या गुणवत्तेवरुन काही दिवसांपूर्वी खूप चर्चा झाली होती. मुंबई शहरातील (Mumbai City Air) हवेचा दर्जा अतिशय वाईट झाल्याची माहिती समोर आली होती. या मुद्द्याची चर्चा विधिमंडळापर्यंत पोहोचली आहे. मुंबईतील हवेचा दर्जा सुधारला पाहिजे आणि मुंबईकरांना स्वच्छ हवा मिळाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. यासाठी मुंबईत 14 ठिकाणी हवा तपासणी केंद्रे उभारण्यात आली असून त्यातील तीन तपासणी केंद्रे कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहेत.
संबंधित बातम्या :