एक्स्प्लोर
शिक्षणमंत्री, कुलगुरुंचा राजीनामा घ्या, आदित्य ठाकरेंची मागणी
मुंबई विद्यापीठातील गोंधळाबाबत आता युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली आहे. कुलगुरु आणि शिक्षणमंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठातील गोंधळाबाबत आता युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली आहे. कुलगुरु आणि शिक्षणमंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागत आहे, याला कुलगुरु संजय देशमुख आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे जबाबदार आहेत, त्यामुळे त्या दोघांचे राजीनामे घ्यावे अशी मागणी आदित्य ठाकरेंनी राज्यपालांकडे केली आहे. विद्यापीठाचा निकाल आटोपण्यासाठी मुंबईतील महाविद्यालयं गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. ऑनलाईन असेसमेंटसाठी 4 दिवस विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णयही दुर्दैवी असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबई विद्यापीठातील परीक्षांचा निकाल लावण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची प्रचंड धावपळ सुरु आहे. लवकरात लवकर उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण करण्यासाठी आजपासून मुंबईतील महाविद्यालयांमध्ये अध्यापन सुट्टी जाहीर केली गेली आहे. गुरुवारपर्यंत ही महाविद्यालये बंद असणार आहेत. या चार दिवसांत महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कोणतेही काम होणार नाहीये. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर कुलपती सी. विद्यासागर राव यांनी विद्यापीठाला 31 जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करावेत, अशी तंबी दिली होती.
आणखी वाचा






















