एक्स्प्लोर
मित्रांच्या पत्नीबद्दल अपशब्द, मुंबईत 20 वर्षीय डान्सरची हत्या
मुंबई : मित्राच्या पत्नीला अपशब्द वापरल्याने मुंबईत एका डान्सरची हत्या करण्यात आली आहे. प्रतिक कदम असं हत्या करण्यात आलेल्या 20 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो किंग्स युनायटेड इंडिया या हिप हॉप ग्रुपचा सदस्यही होता.
प्रतिक कदम, त्याचे दोन मित्र शुभम भिसे आणि सम्राट पावसकर यांच्यासोबत रविवारी दारु पित होता. त्याचवेळी नशेत प्रतिकने सम्राट आणि शुभम या दोघांच्या पत्नीविरुद्ध अश्लील टिपणी केली. त्यामुळे संतापलेल्या सम्राट पावसकर आणि शुभम भिसेनं सिमेंट ब्लॉकनं प्रतिकला मारहाण करण्यास सुरुवात केली.
डोक्याला जबर मार लागल्यानं प्रतिक कदमचा मृत्यू झाला. शुभम आणि सम्राटवर हत्येचा गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
प्रतिक सदस्य असलेल्या युनायटेड इंडिया हिप हॉप ग्रुपने अनेक टीव्ही कार्यक्रम आणि रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. 2015 मध्ये अमेरिका हिपहॉप चॅम्पियनशीपमध्ये या ग्रुपने कांस्यपदक पटकावलं होतं. तर प्रतिक हृतिकसोबत एका शूजच्या जाहिरातीत झळकला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement