एक्स्प्लोर

दादर ते अंधेरी, 500 ते हजार, टॅक्सी चालकांची मुजोरी

दादर टीटी परिसरात एबीपी माझाच्या प्रतिनिधीने टॅक्सीचालकाला अंधेरीला जाण्यासाठी विचारणा केली. मात्र काहींनी येण्यास नकार दिला, तर काहींनी जास्त पैशांची मागणी केली.

मुंबई : पावसामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अंधेरीतील पुलाचा पादचारी भाग कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सर्व भार आता रस्ते वाहतुकीवर आहे. मात्र या संधीचा फायदा घेत टॅक्सीचालक प्रवाशांची लूट करत आहेत. प्रवाशांची लूट करत असणाऱ्या अशाच काही टॅक्सी चालकांशी एबीपी माझाने बातचीत केली. दादर टीटी परिसरात एबीपी माझाच्या प्रतिनिधीने टॅक्सीचालकाला अंधेरीला जाण्यासाठी विचारणा केली. मात्र काहींनी येण्यास नकार दिला, तर काहींनी जास्त पैशांची मागणी केली. दादर ते अंधेरी, 500 ते हजार, टॅक्सी चालकांची मुजोरी दादरहून अंधेरी पूर्वला येण्याचे दोनशे ते अडीचशे रुपये होतात. मात्र एका टॅक्सीवाल्याने आमच्याकडे पाचशे रुपये मागितले, तर दुसऱ्याने सहाशे रुपये. शिवाय एकाने मीटरच्या अतिरिक्त दीडशे रुपयांची मागणी केली. अनेक जण वेगवेगळी कारणं सांगून येण्यास नकार देत आहेत. टॅक्सीवाल्यांचा हा मनमानी कारभार एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या पावसातही हीच परिस्थिती होती. तेव्हाही एबीपी माझाने ही बातमी दिली होती. मात्र मनमानी करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. अंधेरीत पुलाचा पादचारी भाग कोसळला मुंबईत कालपासून सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे अंधेरीतील गोखले ब्रिजच्या फुटपाथचा काही भाग कोसळला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. फुटपाथचा भाग थेट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे  पश्चिम रेल्वेवरील अंधेरीपासूनची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. फलाट क्रमांक 8 आणि 9 यांच्यामधील हा ब्रिज होता. त्या ब्रिजवरील फुटपाथचा काही भाग कोसळला. हा पूल 1960-70 चा असल्याने खूपच जीर्ण झाला होता, त्याला लोखंडाचा सपोर्ट दिला होता. मात्र आज सकाळी साडेसातच्या सुमारास तोही कोसळला. ब्रिज आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या. ब्रिज कोसळल्याने मोठ्या प्रमाणात ढिगारा साचला आहे. पावसामुळे हा ढिगारा काढणं मोठं जिकीरीचं काम आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी
संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार, 35 दिवसांचा राज्यव्यापी दौरा, 10 लाख लोकांपर्यंत पोहोचणार, आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार,राज्यव्यापी दौऱ्यात आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
MNS : राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दुष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, रोषणाई-आतिषबाजी रद्द
राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दु्ष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, शिवाजी पार्कवरील रोषणाई-आतिषबाजी रद्द

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Azam Khan: आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
जळगावमध्ये भारदिवसा स्टेट बॅंकेवर दरोडा, तब्बल 30 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास, गावकऱ्यांसह पोलिसांची मोठी कामगिरी, आरोपींना सिनेस्टाईलने पकडले 
जळगावमध्ये भारदिवसा स्टेट बॅंकेवर दरोडा, तब्बल 30 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास, गावकऱ्यांसह पोलिसांची मोठी कामगिरी, आरोपींना सिनेस्टाईलने पकडले 
Sanjay Raut: संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी
संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, गर्भपात, जीवे मारण्याची धमकी; दापोलीत 50 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, गर्भपात, जीवे मारण्याची धमकी; दापोलीत 50 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा
Israel Election: इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी
इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
राज्यात बार्शीची सरशी.. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5000 जमा, मेसेजही आला; दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांना अग्रीम मदत
राज्यात बार्शीची सरशी.. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5000 जमा, मेसेजही आला; दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांना अग्रीम मदत
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली; फोटो पोस्ट करत म्हणाले, 'एका नव्या पर्वाची सुरुवात झाली..'
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली; फोटो पोस्ट करत म्हणाले, 'एका नव्या पर्वाची सुरुवात झाली..'
Embed widget