एक्स्प्लोर
मल्टिप्लेक्स चालक राज ठाकरेंच्या भेटीला 'कृष्णकुंज'वर
खाद्यपदार्थांच्या वाढत्या दरांप्रश्नी हायकोर्टातून कोणताही दिलासा न मिळल्यामुळे मल्टिप्लेक्स चालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

मुंबई : मनसेने राज्यभरातील मल्टिप्लेक्स विरोधात सुरु केलेलं आंदोलन यशस्वी झाल्याचं चित्र आहे. या आंदोलनासंदर्भात हायकोर्टातून कोणताही दिलासा न मिळल्यामुळे अखेरीस या मल्टिप्लेक्स चालकांनी शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यभरातील मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये सुरु असलेल्या अवाजवी दरांतील खाद्यपदार्थ विक्रीला विरोध करत 'खळ्ळखटॅक स्टाईल'मध्ये आंदोलन सुरु केलं होतं. या आंदोलनाचा परिणाम म्हणून येत्या काही दिवसांत सर्वसामान्यांच्या पसंतीच्या काही खाद्यपदार्थांचे दर किमान 50/- रुपयांवर आणू, असं आश्वासन थिएटर चालकांकडून राज ठाकरे यांना देण्यात आलं. यात पाण्याची बाटली, समोसा, पॉपकॉर्न, वडापाव अशा सर्वसामान्यांच्या पसंतीच्या पदार्थांचा समावेश असेल.
पुणे, ठाणे, नागपूर, उल्हासनगर, मनसेचा थिएटरमधील लुटीविरोधात एल्गार
हे आंदोलन संपलं नसल्याचं यावेळी मनसेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे हे दर कमी न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असं मनसेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. तसंच राज्य सरकारला मराठी माणसाची काहीही चिंता पडलेली नाही. सर्वसामान्य मराठी माणसाला रोजच्या जीवनात काय समस्या भेडसावतात याच्याशी राज्य सरकारला सोयरसुतक नाही, म्हणनूच खाद्यपदार्थांच्या दरासाठी असो किंवा मराठी सिनोमांना मल्टिप्लेक्समध्ये शो मिळवून देण्यासाठी असो, मनसेला कायदा हातात घ्यावा लागतो, असं मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले. जैनेंद्र बक्षी यांनी सिनेमागृहांत बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यावरील बंदी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. यावरील सुनावणी दरम्यान हायकोर्टानं बाहेर पाच रुपयांत मिळणारे पॉपकॉर्न मल्टिप्लेक्समध्ये 250 रुपयांना विकलं जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर मनसेनं मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील इतर ठिकाणी आपल्या स्टाईलमध्ये आंदोलनं केली होती.संबंधित बातम्या 5 रुपयांचे पॉपकॉर्न मल्टिप्लेक्समध्ये 250 रुपयांत का?: हायकोर्ट 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना का? पुण्यात मनसैनिकांची थिएटर मॅनेजरला मारहाण
आणखी वाचा























