एक्स्प्लोर

अनिल देशमुखांची Default Bail साठी न्यायालयात धाव; CBI चा जोरदार विरोध, आज पुन्हा सुनावणी

Anil Deshmukh Default Bail in Mumbai Session Court : अनिल देशमुखांची Default Bail साठी मुंबई सत्र न्यायालयात धाव. CBI कडून जोरदार विरोध, आज पुन्हा सुनावणी

Anil Deshmukh Default Bail in Mumbai Session Court : शंभर कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांमुळे सध्या न्यायालयीनं कोठडीत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सुटकेसाठी अनेक प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनिल देशमुखांनी डिफॉल्ट (Default) जामीन मिळावा यासाठी विशेष सीबीआय न्यायालयात धाव घेतली आहे. अनिल देशमुखांच्या जामीन अर्जाला सीबीआयकडून मात्र जोरदार विरोध करण्यात आला. यावेळी तपास यंत्रणेचं आरोपपत्र अपूर्ण असल्याचा दावा अयोग्य असल्याची माहिती सीबीआयानं दिली. याप्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. 

अनिल देशमुखांच्या डिफॉल्ट जामीन अर्जाला विरोध करतानाच सीबीआयनं या प्रकरणात दाखल करण्यात आलेलं आरोपपत्र हे पूर्ण असल्याचा दावाही सीबीआयनं केला आहे. अनिल देशमुखांसह संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांच्या विरोधात सीबीआयनं 59 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. मुंबई पोलीस दलातील बरखास्त पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) हा या प्रकरणातील माफीचा साक्षीदार बनला आहे. 

देशमुखांच्या विरोधात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

अनिल देशमुखांविरोधात सीबीआयनं आपलं पहिलं आरोपपत्र सादर केलं आहे. दरमहा 100 कोटींच्या कथित खंडणी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांनुसार, सीबीआयनं पहिला गुन्हा नोंदवत तपास सुरू केला होता. पुढे ईडीनं याच एफआयआरमध्ये अनिल देशमुखांसह इतरांना अटक केली. त्यानंतर हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना एप्रिल 2022 मध्ये सीबीआयनं अनिल देशमुखांसह संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझेला आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतलं. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात संक्षिप्त आरोपपत्र दाखल केलं. यात अनिल देशमुखांसह त्यांचे स्विय सहाय्यक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांचाही आरोपी म्हणून आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. तर सचिन वाझे हे आता या प्रकरणी माफीचा साक्षीदार म्हणून तपासयंत्रणेची आणि कोर्टाची मदत करणार आहेत.  

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. तसेच बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि इतरांना बार आणि रेस्टॉरंटमधून महिन्याला 100 कोटी वसूल करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोपही केला. या प्रकरणी नोव्हेंबर 2021 मध्ये 72 वर्षीय देशमुखांना ईडीनं अटक केली. तेव्हापासून देखमुख आर्थर रोड कैदेतच आहेत. त्यानंतर या प्रकरणात सीबीआयनं मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाकडून देशमुखांचा जबाब नोंदविण्यासाठी परवानगी मिळवली. 3 ते 5 मार्च 2022 रोजी कारागृहात जाऊन देशमुखांचा जबाब नोंदवला. याप्रकरणी सीबीआयच्यावतीनं विशेष सीबीआय न्यायालयात 59 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : मुंबई होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, अजूनही 30 जण अडकल्याची भीतीAmol Kolhe : शिरुरमध्ये पोलिंग एजंट बनून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मनमानी कारभारEknath Shinde on Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया ABP MajhaGhatkopar Hoarding Accident : मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, 51 जणांना बाहेर काढण्यात यश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Embed widget