एक्स्प्लोर
बेस्ट संपात मनसेची उडी, कोस्टल रोड आणि मेट्रो 3 विरोधात आंदोलन
संपकरी बेस्ट कामगारांच्या बाजूने महाराष्ट् नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे. बेस्ट कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मुंबईत विविध ठिकाणी सुरु असलेली विकासकामं मनसे कार्यकर्त्यांनी बंद पाडली.
मुंबई : बेस्ट कामगारांच्या संपाचा आजचा सातवा दिवस आहे. या संपामुळे मुंबईकरांचे आतोनात हाल होत आहेत. महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेने हात वर केल्यानंतर आता संपकरी बेस्ट कामगारांच्या बाजूने महाराष्ट् नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे.
बेस्ट कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मुंबईत विविध ठिकाणी सुरु असलेली विकासकामं मनसे कार्यकर्त्यांनी बंद पाडली. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत तोवर विकासकामं सुरु होऊ देणार नाही, अशी भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
आज सकाळी वरळीतले कोस्टल रोड आणि मेट्रो 3 चे काम मनसे कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने बंद पाडले. बंद पाडलेले कोस्टल रोडचे काम दुपारी पुन्हा सुरु केले आहे. परंतु मेट्रो 3 चे काम अजूनही ठप्पच आहे.
दरम्यान बेस्टच्या संपात एनएमएमटी प्रवाशांनादेखील मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. सायन-पनवेल महामार्गावर चेंबूरजवळ मनसे कार्यकर्त्यांनी एनएमएमटीच्या बसेस अडवल्या आणि प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. या प्रकारामुळे नवी मुंबईकरांना मोठा मनःस्ताप होत आहे.
याबाबत मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी पक्षाची अधिकृत भूमिका मांडली आहे. देशपांडे म्हणाले की, "एनएमएमटीच्या बसमधून प्रवाशांना उतरवणं ही पक्षाची भूमिका नाही. पक्षाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे. जनतेला त्रास देण्याचा पक्षाचा उद्देश नाही."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement