'हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली, राज्यपालांनी नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये; मनसेही राज्यपालांविरोधात आक्रमक
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राज्यपालांनी नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये असं म्हणत मनसेनं (MNS) कोश्यारी यांना इशारा दिला आहे.
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari controversial statement) यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान केला आहे असं म्हणत विरोधकांसह सामान्य नागरिकांनी त्यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत. राज्यपालांनी नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये असं म्हणत मनसेनं (MNS) भगतसिंह कोश्यारी यांना इशारा दिला आहे.
हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली
हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे, असं मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी म्हटलं आहे. मागे सावित्रीमाई बद्दल आता मराठी, महाराष्ट्राबद्दल बेताल वक्तव्य केलं आहे. हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही. मराठी, महाराष्ट्राची सभ्यता, संस्कृतीचा अवमान होत असेल तर राज्यपाल या पदाचा मान, मरातब गेला चुलीत. ज्या विषयात कळत नाही तिथे चोमडेपणा करू नका, असं काळे यांनी म्हटलं आहे.
मागे सावित्रीमाई बद्दल आता मराठी,महाराष्ट्राबद्दल बेताल वक्तव्य.
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) July 30, 2022
हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे.
हे खपवून घेतलं जाणार नाही.
मराठी,महाराष्ट्राची सभ्यता,संस्कृतीचा अवमान होत असेल तर राज्यपाल या पदाचा मान,मरातब गेला चुलीत.
ज्या विषयात कळत नाही तिथे चोमडेपणा करू नका
नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये
मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी म्हटलं आहे की, ज्यांना असं वाटतं आर्थिक प्रगती हीच प्रगती आहे ही बौद्धिक दिवाळखोरी आहे. मराठी माणसाच्या त्यागामुळं मुंबई आणि महाराष्ट्र घडला आहे. मराठी माणसांमुळं इतरांचा फायदा झाला आहे. राज्यातील आधीच्या सरकारने जी धोरण आखली त्यामुळे मुंबई, महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे आले, म्हणून महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र प्रगत झालाय. महाराष्ट्राचा अपमान कदापी सहन करणार नाही. नको त्या ठिकाणी जे समजत नाही त्या बाबत त्यांनी बोलू, नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये, असं त्यांनी म्हटलं आहे.
मुंबईच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा हात
देशपांडे यांनी म्हटलं आहे की, ज्या गोष्टीची माहिती नाही, महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, त्यावर बोलू नये, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसण्याची गरज नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र किंबहुना मुंबईच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा हात आहे, इथे बाकी लोक आले, त्यांनी स्वतःची प्रगती केली, त्यामुळे महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या प्रगतीत त्यांचा हात नाही, असेलच तर त्यांच्या प्रगतीत महाराष्ट्र किंवा मुंबईचा हात आहे, 105 हुतात्म्यांनी बलिदान देऊन ही मुंबई महाराष्ट्रात आणली आहे, त्यामुळे ज्या गोष्टी माहिती नाही, इतिहास माहिती नाही, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे" अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
राज्यपालांना ही पहिली वॉर्निंग आहे, इथे आलाय राज्यपाल म्हणून, आम्ही त्यांचा आदर करतो, त्यांच्या पदाचा आदर करतो, त्यांनी गुण्यागोविंदाने इथे राहावं, नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये, असंही देशपांडेंनी म्हटलं आहे.
राज्यपालांनी नेमकं काय म्हटलं आहे...
'कधी कधी मी इथं लोकांना म्हणतो की, महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढा, तर तुमच्याकडे पैसाच राहणार नाही. तुम्ही जे मुंबईला आर्थिक राजधानी म्हणताय ती राजधानी राहणारच नाही', असं राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या