एक्स्प्लोर

खड्ड्यांच्या मुद्द्यावर मनसे गप्प बसणं शक्यच नाही : राज ठाकरे

गेले कित्येक दिवसांपासून विविध आंदोलनांनी महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचा मला अभिमान आहे आणि त्यांचं मी अभिनंदन करतो, असे म्हणत राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांचा अभिमान व्यक्त करत, त्यांचं अभिनंदनही केले.

मुंबई : खड्ड्यांच्या मुद्द्यावर मनसे गप्प बसणे शक्यच नाही, गेले काही दिवस आमच्या पक्षातर्फे राज्यभर आंदोलनं सुरु आहेत, व्यवस्थेला जागं करणं सुरु आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. आंदोलन करणाऱ्यांचा आपल्याला अभिमान आहे, असे राज ठाकरे म्हणाले. खड्ड्यांसंदर्भात राज ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. “राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग असो अथवा मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, पुणे ते थेट चंद्रपूरपर्यंतच्या महापालिका, ह्यांच्या बेजबाबदार आणि असंवेदनशील कारभारामुळे 'रस्त्यात खड्डे' म्हणायच्या ऐवजी 'खड्ड्यात रस्ता' म्हणावं लागेल अशी सर्वत्र परिस्थिती आहे.”, असे म्हणत राज ठाकरेंनी बांधकाम विभाग आणि महापालिका प्रशासनांवर निशाणा साधला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात केलेल्या विविध अनोख्या आंदोलनांचं कौतुकही राज ठाकरेंनी केले. ते म्हणाले, “राज्यभर माझ्या महाराष्ट्र सैनिकांची आंदोलनं सुरु आहेत. ही आंदोलनं लोकांसाठी आहेत. असंवेदनशील सरकारी व्यवस्थेला जागं करण्यासाठी सुरु आहेत. मग ते खड्डयांनी भरलेल्या शीव-पनवेल रस्त्यावर केलेलं आंदोलन, कल्याण-डोंबिवली महापालिकेवर नेलेला मोर्चा असेल, पुण्यातील प्रशासकीय कार्यालयात तिरडी ठेवून निषेध केलेलं आंदोलन, चंद्रपूरमध्ये खड्ड्यात मत्स्यपालन करून केलेलं निषेध आंदोलन, पालघरमधील बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन, बांधकाम विभागाच्या कार्यालयात जावून रक्तदान करणं, मंत्रालयासमोरील प्रतीकात्मक आंदोलन, मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दुरुस्तीसाठी केलेलं यशस्वी आंदोलन, मुंबईत टोलबंद आंदोलनाची हाक, ठाणे शहरातील निदर्शनं असतील. हेतू एकच ह्या व्यवस्थेला स्वतःची लाज वाटावी आणि परिस्थती सुधारावी.” तसेच, गेले कित्येक दिवसांपासून विविध आंदोलनांनी महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचा मला अभिमान आहे आणि त्यांचं मी अभिनंदन करतो, असे म्हणत राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांचा अभिमान व्यक्त करत, त्यांचं अभिनंदनही केले. राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट :

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Maharashtra Live News Updates: गोकुळचा मोर्चा! तुफान भाषणं, कोल्हापुरात हजारोंचा हुंकार, सरकारविरोधात एल्गार LIVE
Maharashtra Live News Updates: गोकुळचा मोर्चा! तुफान भाषणं, कोल्हापुरात हजारोंचा हुंकार, सरकारविरोधात एल्गार LIVE
Mumbai Water Cut: मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, हिवाळ्यातच तलावांमधील पाणीसाठ्यात घट, BMC चं राज्य सरकारला पत्र, नेमकं काय झालं?
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, हिवाळ्यातच तलावांमधील पाणीसाठ्यात घट, BMC चं राज्य सरकारला पत्र, नेमकं काय झालं?
Western Railway Mumbai Local Train Updates: विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळच्या संत्तासंघर्षावर जोरदार युक्तिवाद; सरकारची बाजू मांडणाऱ्या वकीलाच्या एका वाक्याने गेम पटलणार?, कोर्टात काय घडलं?
गोकुळच्या संत्तासंघर्षावर जोरदार युक्तिवाद; सरकारची बाजू मांडणाऱ्या वकीलाच्या एका वाक्याने गेम पटलणार?, कोर्टात काय घडलं?
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
Dharashiv Fire Incident News: पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
Vishwajeet Kadam and Satej Patil: स्टेजवर भाषणं सुरु असताना बंटी पाटलांच्या मनात वेगळीच तगमग, सतत मोबाईलकडे नजर, विश्वजित कदमांनी अस्वस्थता ओळखली, म्हणाले...
स्टेजवर भाषणं सुरु असताना बंटी पाटलांच्या मनात वेगळीच तगमग, सतत मोबाईलकडे नजर, विश्वजित कदमांनी अस्वस्थता ओळखली, म्हणाले...
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
Gokul Kolhapur Dasara Chowk: सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
Embed widget