एक्स्प्लोर
पनवेलमध्ये भाजप नगरसेवकाचा मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला
पनवेल मनपा निवडणुकीत नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते.

पनवेल : पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी 29 एप्रिल रोजी मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आठ ते दहा गुंडांसोबत स्वतः नगरसेवक विजय चिपळेकर यांनी प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. मध्यरात्री 12 वाजता घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या हल्ल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांचे गुंड साथीदार फरार झाले आहेत. या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. पनवेल मनपा निवडणुकीत नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते. मनसे कार्यकर्ता प्रशांत जाधव यांनी आपले पैसे पकडून दिल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचं समजतं. 29 एप्रिल रोजी मतदान संपल्यानंतर प्लॅनिंगने हा हल्ला करण्यात आला आहे. कामोठे पोलिस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आणखी वाचा























