एक्स्प्लोर

KDMC News : 'मागे घशात हात घालून दात काढले, आता एकमेकांचे कपडे फाडतायत', आमदार राजू पाटील यांची सेना-भाजपवर टीका 

KDMC News : 'कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना भाजप वादावर मनसे आमदार राजू पाटील यांनी वक्तव्य करत दोन्ही पक्षांवर टीका केली आहे.

कल्याण : 'मागे घशात हात घालून दात काढले, आता एकमेकांचे कपडे फाडतायत. शिवसेना भाजपने शहरासाठी काही केलं नाही आताही निवडणूका पाहून लोकांना आकर्षित करण्यासाठी भांडत आहेत. पण जनता यंदा बरोबर विचार करेल,' अशी टीका कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना भाजप वादावर मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

मराठी भाषा दिनानिमित्त मनसे तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातील एका कार्यक्रमादरम्यान राजू पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप-शिवसेनेवर टीका केली. तसचं मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त वापर केला पाहिजे असे आवाहनही केले. कल्याण डोंबिवलीत आगामी निवडणूकांच्या आधी शिवसेना भाजप मध्ये सुरू असलेल्या कलगीतुऱ्याबाबत राजू पाटील यांनी भाष्य केलं. यावेळी मागील पालिका इलेक्शन दरम्यान भाजपकडून 'घशात हात घालून दात मोजणार' अशा संदर्भाची टीका करण्यात आली होती.  आता  एकमेकांचे कपडे फाडण्याबाबत बोललं जात आहे. दरम्यान याबाबत बोलताना राजू पाटील यांनी हे दोन्ही पक्ष आपआपसांत भांडतात पण शहऱासाठी काहीच करत नाहीत. असं म्हटलं आहे. 

मनसेतर्फे एक दौड जवानांसाठी

डोंबिवली मनसे शहर शाखेतर्फे एक दौड जवानांसाठी गेट वे ऑफ इंडिया मुंबई ते डोंबिवली अशी 65 किलोमीटरची दौड आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ठाणे रायगड जिल्ह्यातील खेळाडू, डॉक्टर सहभागी झाले होते. रात्री 12 वाजता गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथून धावायला सुरवात केली. डोंबिवली येथे सकाळी 9 ला ते सर्वजण पोहोचले. महिला आणि पुरुष मिळून 100 जण यामध्ये सहभागी झाले होते. यातून मिळणारा निधी हा जवानांना मदतीसाठी दिला जाणार असल्याचं मनसे तर्फे सांगण्यात आले. या धावपटूचा सन्मान मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 

हे ही वाचा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Embed widget