एक्स्प्लोर
सत्ता देऊन बघा, कुणीही रडताना दिसणार नाही : राज ठाकरे
मुंबईत बिल्डर लॉबी झोपडपट्ट्या वसवतेय. या लॉबीमध्ये अमराठी बिल्डरांसोबत मराठी बिल्डरही आहेत, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला.

मुंबई : हे राज्य एकदा माझ्या हातात देऊन बघा, पुन्हा कुणीही रडताना दिसणार नाही, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. मुंबईतील वांद्रे येथे शासकीय वसाहतीतल्या कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत चर्चेसाठी राज ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
बिल्डर लॉबीवर गंभीर आरोप
मुंबईत बिल्डर लॉबी झोपडपट्ट्या वसवतेय. या लॉबीमध्ये अमराठी बिल्डरांसोबत मराठी बिल्डरही आहेत, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला.
शासकीय वसाहतीतल्या रहिवाशांना आश्वासन
शासकीय वसाहतीतला मराठी माणूस याच जागेवर घर बांधून राहील. सरकारमध्ये हिंमत असेल, तर तुम्हाला बाहेर काढून दाखवावं, असं आव्हान राज ठाकरेंनी सरकारला दिले. तसेच, तुमची घरं तुम्हाला याच जागेत मिळणार, असे आश्वासनही शासकीय वसाहतीतल्या रहिवाशांना राज ठाकरेंनी दिले.
जसं शिवाजी पार्क, तसं माझ्यासाठी वांद्रे पूर्व, असे सांगायलाही राज ठाकरे विसरले नाहीत.
झोपडपट्टी पुनर्वसनसारख्या योजना खासगी बिल्डरला का देता? असा सवाल सरकारला विचारत राज ठाकरे पुढे म्हणाले, “सरकारने झोपडपट्टी पुनर्वसनाच्या योजना राबवल्या, तर महाराष्ट्रावरील कर्ज कमी होईल.”
नरेंद्र मोदींचा मुंबईवर डोळा आहे. मराठी माणसाचं अस्तित्व संपवायचा प्रयत्न सुरु आहे, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच, मुंबई गुजरातला जोडायचा भाजपचा डाव असून, मुंबई गुजरातला जोडण्यासाठी बुलेट ट्रेनचा घाट घातला जातो आहे, असेही ते म्हणाले.
भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
- बाहेरच्या राज्यांमधून येणाऱ्या लोकांसाठी जागा रिकाम्या करणं सुरु आहे - राज ठाकरे
- मुंबई गुजरातला जोडण्यासाठी बुलेट ट्रेनचा उद्योग सुरुय - राज ठाकरे
- मुंबईतील बिल्डर लॉबी झोपडपट्ट्या वसवतेय - राज ठाकरे
- बेहरामपाड्यात चार-चार मजल्यांच्या झोपड्या उभ्या राहतात, अगदी राज्यकर्त्यांच्या डोळ्यांदेखत - राज ठाकरे
- 'इंच इंच विकू' अशी महाराष्ट्रामध्ये स्थिती - राज ठाकरे
- प्रत्येक राज्यात त्यांच्या त्यांच्या लोकांचा पहिला विचार करतात - राज ठाकरे
- वांद्र्यातील गव्हर्नमेंट कॉलनीतला मराठी माणूस इथेच राहील, सरकारने इथल्या माणसांना बाहेर काढण्याचा
- नुसता प्रयत्न करुन पाहावा, राज ठाकरेंचं सरकारला आव्हान
- हे राज्य एकदा माझ्या हातात देऊन बघा - राज ठाकरे
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
























