भूक लागली म्हणून रोहित पवारांनी गाडी गाठली आणि स्वत:च्या हाताने अंडा भुर्जी बनवली!
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी काल नवी मुंबईचा दौरा केला. यावेळी त्यांनी एपीएमसी मार्केटला भेट दिली. त्यानंतर संध्याकाळी फेरफटका मारताना भूक लागली म्हणून त्यांनी अंडा भुर्जीचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी स्वत: अंडा भुर्जी बनवली.
![भूक लागली म्हणून रोहित पवारांनी गाडी गाठली आणि स्वत:च्या हाताने अंडा भुर्जी बनवली! MLA Rohit Pawar cooks Anda Bhruji in his Navi Mumbai visit भूक लागली म्हणून रोहित पवारांनी गाडी गाठली आणि स्वत:च्या हाताने अंडा भुर्जी बनवली!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/06141530/Rohit-Pawar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी (5 जानेवारी) नवी मुंबईचा दौरा केला. पहाटे चार वाजताच रोहित पवार यांनी नवी मुंबई एपीएमसीमधील भाजी मार्केटला भेट दिली. त्यानंतर संध्याकाळी नवी मुंबईचा फेरफटका मारला. यावेळी त्यांनी एका अंडा भुर्जीच्या गाडीवर स्वत:च अंडा भुर्जी बनवली. स्वत: रोहित पवार यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली.
"नवी मुंबईत विविध ठिकाणी भेट देत असताना भूक लागल्याने एके ठिकाणी सर्वांनी अंडा भुर्जीचा आस्वाद घेतला. यावेळी अंडा भुर्जी बनवतानाचं त्या युवाचं स्कील पाहून मलाही अंडा-भुर्जी बनवण्याचा मोह आवरला नाही. शेवटी त्याच्यासारखी भुर्जी मला बनवता आली नाही पण प्रयत्न केल्याचा आनंद मात्र मिळाला', असं रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितलं.
नवी मुंबईत विविध ठिकाणी भेट देत असताना भूक लागल्याने एके ठिकाणी सर्वांनी अंडा भुर्जीचा आस्वाद घेतला.यावेळी अंडा भुर्जी बनवतानाचं त्या युवाचं स्कील पाहून मलाही अंडा-भुर्जी बनवण्याचा मोह आवरला नाही. शेवटी त्याच्यासारखी भुर्जी मला बनवता आली नाही पण प्रयत्न केल्याचा आनंद मात्र मिळाला. pic.twitter.com/T93MXIFcu3
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 5, 2021
खरंतर राजकारणात हातखंडा असलेल्या आमदार रोहित पवारांना रस्त्यावरील गाडीवर अंडा भुर्जी बनवताना पाहून तिथे उपस्थित सर्वच आवाक झाले. अंडा भुर्जी बनवणाऱ्या तरुणासारखी भुर्जी आपल्याला बनवता आली नाही, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.
दरम्यान याआधी मातृदिनाला रोहित पवार यांनी त्यांच्या मातोश्रींसाठी चहा बनवला होता. त्याचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. आता गाडीवर अंडा भुर्जी बनवतानाचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.
रोहित पवार यांनी मंगळवारी नवी मुंबईचा दौरा केला. सर्वात आधी एपीएमसीमधील यंत्रणा जाणून घेण्यासाठी त्यांनी पहाटे चार वाजता भाजी मार्केटला भेट दिली. यावेळी शेतकरी वर्गाने पाठवलेल्या मालाचे मूल्यमापन कसे होते, व्यापारी, माथाडी वर्गाच्या समस्या काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रोहित पवारांनी ट्वीट करुन याची माहिती दिली.
यावेळी नागरिकांशी अनेक विषयांवर चर्चा झाली. नवी मुंबईत असलेली गावाकडील बरीच मंडळी भेटल्याने आनंद द्विगुणित झाला. यावेळी आमदार @shindespeaks जी, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सूरज जी चव्हाण, तेजस शिंदे, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. pic.twitter.com/var9lxYE4H
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 5, 2021
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)