एक्स्प्लोर
राम कदमांकडून मुलाला वाढदिवसाचं आलिशान गिफ्ट
मुंबई : मुंबईतील घाटकोपरमधील भाजप आमदार राम कदम यांनी त्यांच्या मुलाला वाढदिवसाला अतिशय महागडं गिफ्ट दिलं आहे. मुलगा ओमला राम कदम यांनी आलिशआन कन्व्हर्टेबल मर्सिडीज कार भेट दिली आहे.
स्वत: राम कदम यांनी मुलाचा नव्या कोऱ्यागाडीसोबतचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. "हॅप्पी बर्थ डे टू माय डियरेस्ट सन ओम, धिस इस माय लव्हिंग गिफ्ट फॉर हिम ऑन हिज स्पेशल डे," असं त्यांनी फेसबुकवर लिहिलं आहे.
19 नोव्हेंबर रोजी राम कदम यांचा मुलाच्या वाढदिवस होता. वाढदिवसाला त्याला वडिलांकडून आलिशान कार गिफ्ट मिळाली. या कारची किंमत काही लाखांच्या घरात आहे.
आमदार राम कदम यांनी आतापर्यंत हजारो लोकांना काशीयात्रा घडवली आहे. तसंच मुंबईतील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून राम कदम यांच्या दहीहंडीची ओळख असल्याने ते कायम चर्चेत असतात. आता मुलाला कन्व्हर्टेबल मर्सिडीज कार भेट दिल्याने पुन्हा चर्चा सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
बातम्या
जळगाव
राजकारण
Advertisement