एक्स्प्लोर
कर्जमाफीच्या कामात चुका तर होणारच : सहकारमंत्री
बँक, आयटी विभागांना आलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात येत असून रक्कम बँकांना वर्ग केली जाईल, असंही सुभाष देशमुख म्हणाले.
मुंबई : कर्जमाफीसारख्या योजनेचं काम करताना चुका तर होणारच, असं अजब विधान करत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. बँकांनी दिलेल्या यादीत एकच खातं किंवा आधार कार्डावर शेकडो शेतकरी लाभार्थी असल्याचं समोर आलं आहे.
बँकांकडून सरकारला ही माहिती मिळाली आहे. पती किंवा पत्नीच्या नावावर एकच आधार कार्ड असल्याचं समोर आलं आहे, असं देशमुखांनी सांगितलं. बँक, आयटी विभागांना आलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात येत असून रक्कम बँकांना वर्ग केली जाईल, असंही सुभाष देशमुख म्हणाले.
कर्जमाफीसंदर्भात बिनचूक माहिती असलेल्या खात्यांवर आजपासून रक्कम जमा करण्याचे देण्यात आल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे जमा करा : मुख्यमंत्री
कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी पहिल्या टप्प्याच्या ग्रीन लिस्टमध्ये ज्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यावर माहिती आणि तंत्रज्ञान विभाग आणि बँकांच्या चमुंनी एकत्रित बसून तोडगा काढावा. या यादीतील बिनचूक माहिती असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सुरूवात करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. 18 ऑक्टोबरला साडे आठ लाख शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट तयार करण्यात आली. त्यामध्ये एकाच व्यक्तीच्या नावे दोन वेगवेगळी खाती अशा स्वरूपाच्या काही तांत्रिक बाबी निदर्शनास आल्या. त्यातच दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम हस्तांतरीत होण्यासाठी उशीर झाला.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement