एक्स्प्लोर
चौकीदारीच्या विरोधाभासी विधानांचा आधार घेत मिलिंद देवरांकडून अरविंद सावंतांची गोची
शिवसेनेच्याच या विरोधाभासी विधानांचा आधार घेत देवरांनी अरविंद सावंतांना चांगलंच अडचणीत आणलं.

मुंबई : दक्षिण मुंबईतील लोकसभेचे उमेदवार नुकतेच एका चर्चासत्रात एकत्र आले होते. यावेळी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांनी चौकीदार चोर है या विधानाचा आधार घेत शिवसेनेच्या अरविंद सावंत यांची चांगलीच गोची केली.
चर्चासत्रावेळी मिलिंद देवरा यांनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर शिवसेनेने केलेली विविध वक्तव्य उपस्थितांसमोर मांडली. शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यासमोर गप्प राहण्याशिवाय कोणताही पर्याय यावेळी उपलब्ध नव्हता.
मिलिंद देवरा यांनी 2018 मध्ये उद्धव ठाकरे चौकीदार चोर है म्हणाल्याचा दाखला दिला. तसंच 2019 मध्ये शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचं आपण जन्मापासून चौकीदारच असल्याचं वक्तव्यही उपस्थितांना सांगितलं. शिवसेनेच्याच या विरोधाभासी विधानांचा आधार घेत देवरांनी अरविंद सावंतांना चांगलंच अडचणीत आणलं.
दक्षिण मुंबईतील दोन्ही उमेदवार मिलिंद देवरा आणि अरविंद सावंत मंगळवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये एका चर्चासत्रात भेटले. स्टॉक ब्रोकर्स आणि फंड मॅनेजर यांच्यावरोबर त्यांनी यावेळी चर्चाही केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
राजकारण
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
