एक्स्प्लोर

MHADA : विक्रोळीतील कन्नमवार नगरला मिळणार कम्युनिटी हॉल, म्हाडाची मुंबई उच्च न्यायालयात माहिती

MHADA : या हॉलचा वापर कोण करणार आणि कसा करणार याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने म्हाडाला दिले आहेत.

मुंबई : विक्रोळी येथील कन्नमवार नगरसाठी नवा कम्युनिटी हॉल दिला जाणार आहे, अशी माहिती म्हाडानं (MHADA) मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. त्यावर या हॉलचा वापर कोण आणि कशासाठी करू शकतो याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं म्हाडाला दिले आहेत. न्यायमूर्ती एन. जमादार यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर म्हाडाचे वकील प्रकाश लाड यांनी गुरूवारी ही माहिती दिली. त्याची नोंद घेत हायकोर्टानं वरील आदेश देत सुनावणी 21 ऑगस्टपर्यंत तहकूब केली.

काय आहे प्रकरण?

कन्नमवार नगर इथं एकूण 29 इमारती आहेत. या इमारतीचे बांधकाम साल 1966 मध्ये झालेलं आहे. सध्या या इमारतींचा पुनर्विकास सुरु आहे. मात्र येथील कम्युनिटी हॉलवरुन कन्नमवार नगर सोसायटी व म्हाडामध्ये सध्या वाद सुरु आहे. यासंदर्भात दाखल याचिकेवर सध्या हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. इथल्या इस्टेट मॅनेजरनं हे बांधकाम पाडण्याची धमकी दिली आहे, असा असोसिएशनचा दावा आहे. याशिवाय घरं रिकामी करण्याची कार्यकारी अभियंत्याची नोटीसही बेकायदा आहे, असंही असोसिएशनचे म्हणणं आहे. मात्र जागा रिकामी करुन इमारतीचा ताबा लवकरात लवकर द्यावा जेणेकरुन इथं पुनर्विकास करता येईल, अशी भूमिका म्हाडानं आपल्या प्रतिज्ञापत्रातून नमूद केली आहे.

म्हाडाला सध्या इमारत क्रमांक 17 आणि 19 तसेच कार्यालयीन इमारत 5 व 6 चा पुनर्विकास करायचा आहे. असोसिएशनच्या ताब्यात 1 ते 29 क्रमांकाच्या इमारती आहेत. ज्यामध्ये 464 घरे आहेत. यातील 26 इमारतींपैकी 20 इमारतींचा पुनर्विकास झालेला आहे. तर इमारत क्रमांक 5 मधील कार्यालय हे सोसायटीला दिलं होतं. त्यासाठी त्यांच्याकडून भाडं घेतलं जात होतं. मात्र त्याचा नोंदणीकृत करार झालेला नव्हता. 

या जागेचा खासगी कार्यक्रमांसाठी वापर करून त्याद्वारे नफा कमावला जात होता. मात्र मुळात याची परवानगीच नव्हती, असंही म्हाडानं आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेलं आहे. 17 आणि 19 क्रमांकच्या इमारतीचा पुनर्विकास तातडीनं करण्यात येईल व तेथील रहिवाशांना घरे दिली जातील. तसेच तिथं नवा कम्युनिटी हॉलही दिला जाईल. ज्याचा वापर सोसायटी करु शकेल, असी माहिती म्हाडानं आपल्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident: कसारा घाटात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, कारचा चुराडा, पत्रा कापून जखमींना बाहेर काढलं
नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरचा ब्रेक फेल, कारचा पार चुराडा
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
Jalgaon: जळगावमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जण गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
Jalgaon: जळगावमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जण गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
Vikas Thackeray: लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे काही नेते रात्री नितीन गडकरींशी बोलायचे, विकास ठाकरेंचा खळबळजनक दावा
लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे काही नेते रात्री नितीन गडकरींशी बोलायचे, विकास ठाकरेंचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : 7 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 7 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaSuraj Chavan Bigg Boss Marathi Winner : मजुरी करणारा सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस' 5 मराठीचा विजेताAnath Nathe Ambe : अनाथनाथे अंबे : ह.भ.प. Sanjyot Ketkar यांच्याकडून ऐकूया महिमा मातेचा 07 Oct 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident: कसारा घाटात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, कारचा चुराडा, पत्रा कापून जखमींना बाहेर काढलं
नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरचा ब्रेक फेल, कारचा पार चुराडा
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
Jalgaon: जळगावमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जण गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
Jalgaon: जळगावमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जण गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
Vikas Thackeray: लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे काही नेते रात्री नितीन गडकरींशी बोलायचे, विकास ठाकरेंचा खळबळजनक दावा
लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे काही नेते रात्री नितीन गडकरींशी बोलायचे, विकास ठाकरेंचा खळबळजनक दावा
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Suraj Chavan: विजेता झाल्यावर 14 लाखांचं करणार काय? 'झापुक झुपुक' स्टाईलमध्ये सुरज म्हणाला..
विजेता झाल्यावर 14 लाखांचं करणार काय? 'झापुक झुपुक' स्टाईलमध्ये सुरज म्हणाला..
Horoscope Today 07 September 2024 : आज आठवड्यातील पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज आठवड्यातील पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
Embed widget