एक्स्प्लोर

Mhada News : म्हाडाच्या संक्रमण शिबिरांतील रहिवाशांची महत्त्वाची बातमी; अधिकृत भाडेकरुंची 'अशी' होणार पडताळणी

Mhada News : या आधारे संक्रमण शिबिरातील भाडेकरूंच्या वास्तव्याची प्रमाणता अधिकृत किंवा अनधिकृत असल्याची निश्चिती म्हाडाच्यावतीने करण्यात येणार आहे.

Mhada News :  म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील संक्रमण गाळ्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या भाडेकरूंचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करून त्यांच्या वास्तव्याची प्रमाणता निश्चिती करण्याची जबाबदारी राज्य शासनाने नुकतीच एका अधिसूचनेद्वारे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडे सोपविली आहे. आधार कार्डमध्ये नोंद असलेल्या माहितीच्या आधारे म्हाडा अधिकृत, अनधिकृत रहिवाशांची पडताळणी करणार आहे. 

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरांतील गाळ्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या भाडेकरूंची  आधार कार्ड मध्ये नोंद असलेली माहिती  तसेच ई-केवायसी अधिप्रमाणन सुविधेचा वापर करून बायोमेट्रिक सर्वेक्षणाच्या आधारे मंडळातर्फे पडताळणी करण्यात येणार आहे. या आधारे संक्रमण शिबिरातील भाडेकरूंच्या वास्तव्याची प्रमाणता अधिकृत किंवा अनधिकृत असल्याची  निश्चिती मंडळातर्फे करण्यात येणार आहे.  

महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागातर्फे यासंदर्भात नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. केंद्र शासनाने सुशासनासाठी आधार अधिप्रमाणन नियम, 2020 अन्वये पडताळणी  करण्याच्या उद्देशाने स्वेच्छा तत्वावर सदर जबाबदारी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडे सोपविली आहे.  

महाराष्ट्र शासनाच्या 13 सप्टेंबर 2019  रोजीच्या शासन निर्णयानुसार मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील संक्रमण शिबिरातील अनधिकृत रहिवाशांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने सर्वंकष विचार करून त्यांचे 'अ ' 'ब' 'क' प्रमाणे प्रवर्ग करण्यात आले आहेत.  'अ' प्रवर्गात मूळ रहिवासी यांना संक्रमण शिबिरामध्ये स्थानांतरण करण्यात आलेले आहे. 'ब' प्रवर्गात अशा प्रकारचे रहिवाशी ज्यांनी मुखत्यार पत्र किंवा तत्सम प्राधिकार पत्राद्वारे मूळ रहिवाशांकडून संक्रमण शिबिरातील गाळ्यांचा हक्क घेतला आहे, तसेच 'क' अशा प्रकारचे घुसखोर रहिवाशी ज्यांनी म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांचा अनधिकृतपणे ताबा घेतला आहे. या नुसार मंडळातर्फे सर्वेक्षणाची  कार्यवाही सुरू आहे . सदरील शासन अधिसूचनेमुळे मंडळाच्या सर्वेक्षण प्रक्रियेला देखील वेग मिळणार असल्याची माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident : दोन लोक जागेवरच ठार झाले...प्रत्यक्षदर्शींनी सांगितला कुर्ला बस अपघाताचा थरारZero hour :बेळगाव, कारवार केंद्रशासित करा,आदित्य ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्रKurla Bus Accident : ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं, कुर्ल्यात बेस्ट बस थेट सोसायटीत घुसलीZero Hour: विधानसभेत विरोधीपक्षनेता नाही, फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन पूर्ण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Embed widget