एक्स्प्लोर
जितेंद्र आव्हाडांच्या बनावट फेसबुक अकाऊंटवरुन अभिनेत्रीसह अनेकांना मेसेज
अकांऊट डिलीट व्हायला हवं होतं पण ते अजून का झालं नाही याची कल्पना नाही. आरोपीला शोधण्याचं आश्वासन पोलिसांनी दिल्याचं आव्हाड यांनी सांगितलं.
![जितेंद्र आव्हाडांच्या बनावट फेसबुक अकाऊंटवरुन अभिनेत्रीसह अनेकांना मेसेज Message To Marathi Actress For Jitendra Awhads Fake Facebook Account जितेंद्र आव्हाडांच्या बनावट फेसबुक अकाऊंटवरुन अभिनेत्रीसह अनेकांना मेसेज](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/15152449/Awhad_Fake_FB_Account.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बनावट फेसबूक अकाऊंटवरुन मराठी अभिनेत्रीसह अनेकांना मेसेज गेला आहे. या अकाऊंटमुळे जितेंद्र आव्हाड यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या बनावट अकाऊंटबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांशी बोलणं झालं आहे. त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून कारवाई सुरु केली आहे. शिवाय फेसबुकलाही याबाबत कळवल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
अकांऊट डिलीट व्हायला हवं होतं पण ते अजून का झालं नाही याची कल्पना नाही. आरोपीला शोधण्याचं आश्वासन पोलिसांनी दिल्याचं आव्हाड यांनी सांगितलं.
"घातपात, देशविघातक किंवा समाजविघातक कृत्य घडू नये म्हणून हे प्रकरण मी गांभीर्याने घेतलं. जे होतंय ते चुकीचं आहे," असं जितेंद्र आव्हाड यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
"बनावट अकाऊंटवरुन नेमके काय मेसेज केले ते मला माहित नाही, पण ज्यांना मेसेज गेले, त्यांनी माझ्याशी संपर्क साधून विचारणा केली. तसंच बनावट अकाऊंट सुरु असल्याचं मला दहा दिवसांपूर्वी समजलं पण ते कधीपासून अॅक्टिव्हेट आहे याची मला कल्पना नाही," असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
पाहा जितेंद्र आव्हाड काय म्हणाले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)