बिहारी मॅनेजरकडून मराठी कर्मचाऱ्याला मानसिक त्रास, शिवसेना ठाकरे गट आक्रमक, कंपनीत जाऊन मॅनेजरला समज
मुंबईतील एका कंपनीत बिहारी मॅनेजरकडून (Bihari Manager) मराठी कर्मचाऱ्याला (Marathi Workers) मानसिक त्रास दिला आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
Mumbai News : मुंबईतील एका कंपनीत बिहारी मॅनेजरकडून (Bihari Manager) मराठी कर्मचाऱ्याला (Marathi Workers) मानसिक त्रास दिला आहे. 'एक बिहारी सब पे भारी' असं म्हणत मराठी कर्मचाऱ्याला त्रास दिल्याचा मराठी कर्मचाऱ्याचा बिहारी मॅनेजरवर आरोप आहे. या प्रकारानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनीत जाऊन बिहारी मॅनेजरला समज दिली आहे.
मराठी माणसासाठी शिवसेना सदैव खंबीर..
— Santosh shinde (@Shinde221) December 20, 2024
आज दक्षिण मुंबईतील फोर्ट या विभागातील डाबर कंपनीतील कार्यालयात कार्यरत असलेल्या मराठी माणसाला तेथील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मराठी द्वेष दाखवत एक बिहारी सबसे भारी अशी घोषणा दिली
त्या संबंधित अधिकाऱ्याला माफी मागून समज देण्यात आली @AUThackeray pic.twitter.com/5fpNGIgRQv
मागील सहा महिन्यापासून बिहारी मॅनेजरकडून मराठी कर्मचाऱ्याला सातत्याने टॉर्चर
दक्षिण मुंबईतील कंपनीत मागील 10 वर्षापासून हा मराठी कर्मचारी काम करत आहे. मात्र, मागील सहा महिन्यापासून बिहारी मॅनेजरकडून त्याला सातत्याने टॉर्चर केलं जात आहे. त्यामुळं त्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचं पत्र त्यांनी कंपनीला लिहिलं होतं. याची तक्रार शिवसेना ठाकरे गटाकडे आल्यानंतर ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी आज या कंपनीला भेट देऊन त्या बिहारी मॅनेजरला समज दिली आहे.
दरम्यान, या घटनेबाबत शिवसैनिक संतोष शिंदे यांनी कंपनीतील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच मराठी माणसासाठी शिवसेना सदैव खंबीर असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आज दक्षिण मुंबईतील फोर्ट या विभागातील डाबर कंपनीतील कार्यालयात कार्यरत असलेल्या मराठी माणसाला तेथील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मराठी द्वेष दाखवत एक बिहारी सबसे भारी अशी घोषणा दिली आहे. त्या संबंधित अधिकाऱ्याला माफी मागून समज देण्यात आल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
शिवसेना ठाकरे गट आक्रमक
दरम्यान, या घटनेवरुन शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. भाजप सरकार आलं म्हणून तुम्ही एक बिहारी सबसे भारी असं बोलणार का? असा सवाल शिवसैनिकांनी बिहारी मॅनेजरला विचारला. महाराष्ट्रात येऊन हे चालणार नाही असे शिवसैनिक म्हणाले. मराठी माणसाला असं बोलणं चालणार नाही असेही ते म्हणाले. या प्रकरणी तू माफी मागितली पाहिजे असे शिवसैनिक म्हणाले. त्यानंतर बिहारी कर्मचाऱ्याने माफी मागितली आहे. महाराष्ट्रात मराठी माणसावर कधीही अन्याय झाला न पाहिजे अशी असे मत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.