एक्स्प्लोर

मीडिया अँड एंटरटेन्मेंट समितीचं मुख्यमंत्र्यांना पत्र, प्रमुख चार मागण्या मान्य करण्याची विनंती 

एम एंड ई अर्थात मीडिया एंड एंटरटेन्मेंट ही एक विशेष समिती असून यात मीडिया आणि मनोरंजनसृष्टीशी निगडित सर्वच संघटनांचे प्रतिनिधी आहेत. यात फ्वाईस, सिंटा, इम्पा, आयएफटीपीसी, डब्ल्युआयएफपीए आदी संघटनांचा समावेश होतो.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक द चेनची घोषणा केल्यानंतर मनोरंजनसृष्टीने त्यांचं स्वागत केलं आहे. ब्रेक द चेन अंतर्गत राज्यभरातली चित्रकरणं बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर मनोरंजनसृष्टीने हा निर्णय़ कसोशीने पाळला. आजमितीला राज्यभरात चित्रीकरणं बंद झाली आहेत. मनोरंजनसृष्टीने एकप्रकारे राज्य सरकारला पाठिंबाच  दिला आहे. असं असलं तरी एकूण या व्यवसायात गुंतवला गेलेला पैसा, त्यातून होणारा तोटा पाहता काही गोष्टींची परवानगी मिळावी, अशी मागणी इंडस्ट्रीतल्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी एका पत्राद्वारे ठाकरे सरकारला केली आहे. 

या पत्रात चार प्रमुख मुद्दे आहेत. यातला पहिला मुद्दा आहे तो पोस्ट प्रॉडक्शनच्या कामांना परवानगी मिळण्याचा. चित्रिकरण पूर्ण झाल्यानंतर पोस्ट प्रॉडक्शनचं काम हे बंद खोलीत होतं. त्यासाठी ठराविक स्टाफ नेमण्यात आलेला असतो. या कामांत एडिटिंग, म्युझिक, व्हिएफएक्स, डीआय, कलर करेक्शन्स.. आदींचा समावेश होतो. या कामांना परवानगी मिळावी असं या समितीला वाटतं. 

पत्रातला दुसरा मुद्दा आहे तो या इंडस्ट्रीतल्या गरजू आणि आर्थिक विवंचनेत असलेल्या लोकांना आर्थिक मदत देण्याबाबतचा. उद्धव ठाकरे यांनी समाजातल्या अनेक घटकांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्याप्रमाणे मीडिया आणि एंटरटेन्मेंट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या गरजवंतांनाही राज्य सरकारने मदत द्यावी अशी विनंती यात करण्यात आली आहे. 

या पत्रात तिसरा मुद्दा आहे तो लसीकरणाचा. मनोरंजनक्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनीच लसीकरण घेण्याविषयी यापूर्वीच विषय झाला आहे. तो पाहता लसीकरणाची दोन केंद्र असून एक दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये तर दुसरं मीरा भाईंदर परिसरात असावं अशी मागणी करण्यात आली आहे. 

या पत्रात आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो सेटच्या बांधकामांचा. मुंबईसह परिसरात अनेक ठिकाणी चित्रपटांच्या, मालिकांसाठीच्या सेटची उभारणी चालू आहे. हे सेट भव्य असून त्याचा खर्च मोठा असतो. हे काम सध्या अचानक थांबल्यामुळे निर्मात्याला प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला यात सूट मिळाली आहेच. तशी सेट बांधण्यासाठीही परवानगी मिळावी असं यात मांडण्यात आलं आहे. 

एम एंड ई अर्थात मीडिया एंड एंटरटेन्मेंट ही एक विशेष समिती असून यात मीडिया आणि मनोरंजनसृष्टीशी निगडित सर्वच संघटनांचे प्रतिनिधी आहेत. यात फ्वाईस, सिंटा, इम्पा, आयएफटीपीसी, डब्ल्युआयएफपीए आदी संघटनांचा समावेश होतो. या समितीत खासदार आमोल कोल्हे, आदेश बांदेकर यांचाही समावेश होतो. हे पत्र आरोग्यमंत्री राजेश टोपे, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनाही पाठवण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest : मुलाला आईसह पोलिसांनी ताब्यात घेतलं, मुलाने टाहो फोडला; मुंबईत आंदोलकांवर लाठीचार्ज 
मुलाला आईसह पोलिसांनी ताब्यात घेतलं, मुलाने टाहो फोडला; मुंबईत आंदोलकांवर लाठीचार्ज 
Kalyan Crime News:
"फ्लॅटमध्ये बाथरूमचा नळ सुरूये, तिथे एक डेड बॉडी...'', व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली, दार उघडताच सगळेच चक्रावले
Mhada Lottery Mumbai Homes: मोठी बातमी: मुंबईतील म्हाडांच्या घरांसाठीची प्रतीक्षा संपणार, MHADA लॉटरीची तारीख अखेर जाहीर, कधी होणार घोषणा?
मोठी बातमी: मुंबईतील म्हाडांच्या घरांसाठीची प्रतीक्षा संपणार, MHADA लॉटरीची तारीख अखेर जाहीर, कधी होणार घोषणा?
Uddhav Thackeray: ठाकरेंच्या मुंबईतील आंदोलनानंतर शिवाजी पार्क पोलिसांची मोठी कारवाई, 3 स्वतंत्र गुन्हे दाखल; नेमकं कारण काय?
ठाकरेंच्या मुंबईतील आंदोलनानंतर शिवाजी पार्क पोलिसांची मोठी कारवाई, 3 स्वतंत्र गुन्हे दाखल; नेमकं कारण काय?

व्हिडीओ

NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Embed widget