एक्स्प्लोर

'ते' ट्वीट शिवसैनिकाकडून चुकून टाकलं गेलं; आक्षेपार्ह्य ट्वीटवर महापौर किशोरी पेडणेकरांचं स्पष्टीकरण

आक्षेपार्ह्य ट्वीट मी केलेलं नसून माझ्यासोबत असणाऱ्या एका कार्यकर्त्यानं केलेलं आहे, आता त्याची हकालपट्टीही करण्यात आलेली आहे, असं स्पष्टीकरण महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी आक्षेपार्ह्य ट्वीटसंदर्भात बोलताना दिलं.

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सध्या ट्विटरवर जोरदार ट्रोल होत आहेत. किशोरी पेडणेकर यांनी एका चॅनेलला दिलेली मुलाखत आपल्या ट्विटर हँडलवर ट्वीट केली होती. त्यात त्यांनी मुंबईसाठी 1 कोटी लसीकरण करण्याचा मानस बोलून दाखवला आणि त्यात 9 कंपन्यांचा उल्लेख केला होता. या ट्वीटखाली एका व्यक्तीनं 'कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं?' असा प्रश्न विचारला असता, महापौरांनी उद्धट भाषेत उत्तर दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय. काही वेळानं हा रिप्लाय डीलीट करण्यात आला. मात्र आता त्याचा स्क्रीनशॉट ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे. यासंदर्भात महापौर किशोरी पेडणेकरांना विचारलं असता त्यांनी ते ट्वीट एका शिवसैनिकानं केलं होतं, आणि आता त्याची हकालपट्टी केल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. माध्यमांशी बोलताना महापौरांनी यासंदर्भात खुलासा केला. 

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बोलताना म्हणाल्या की, "काल (बुधवारी) बीकेसीमध्ये कार्यक्रम होता. त्यावेळी माझ्यासोबत शाखाप्रमुख आणि कार्यकर्ते होते. माध्यमांच्या प्रतिनिधींनाही माहीत आहे की, कोणताही कार्यक्रम असेल तर मी माझ्यासोबत मोबाईल ठेवत नाही. मी त्या कार्यकर्त्याकडे मोबाईल दिला. माझा मोबाईल कधीही कोणी घ्यावा आणि चेक करावा, त्याला लॉक नसतो. बसल्या बसल्या त्यानं कदाचित चाळलं असावं. त्यावर अनेक आक्षेपार्ह्य ट्वीट असतात, त्याबद्दल शंकाच नाही. त्यानं रागाच्या भरात ते ट्वीट केलं. त्यानंतर माझ्या हातात मोबाईल आल्यावर मी चेक केलं. माझ्या लक्षात आलं की, त्यानं ही मोठी चूक केली आहे. असं करु नये. कोणी कितीही वाईट वागत असलं तरी आपण वागू नये. या मताची मी आहे. तुम्ही एरवीही माझं वर्तन पाहिलेलं आहे. मी कधीही असं गैरवर्तन करत नाही. मी तत्काळ ते ट्वीट डिलीट केलं. त्या कार्यकर्त्याचीही हकालपट्टी केली आहे."

"याप्रकरणानंतर मलाही चांगला धडा मिळाला आहे की, मोबाईल कोणी कितीही जवळचं असलं तरी त्याच्या हातात देता कामा नये. आता ठिक आहे त्यानं रागाच्या भरात हे ट्वीट केलं. उद्या काहीही होऊ शकतं. त्यामुळे मीसुद्धा एक धडा घेतला की, आपला स्वतःचा मोबाईल कोणाच्याही हातात देता कामा नये.", असंही महापौर म्हणाल्या. 

काय आहे हे प्रकरण?

किशोरी पेडणेकर यांनी एका चॅनेलला दिलेली मुलाखत आपल्या ट्विटर हँडलवर ट्वीट केली होती. त्यात त्यांनी मुंबईसाठी 1 कोटी लसीकरण करण्याचा मानस बोलून दाखवला आणि त्यात 9 कंपन्यांचा उल्लेख केला होता. या ट्वीटखाली एका व्यक्तीनं 'कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं?' असा प्रश्न विचारला असता, महापौरांनी उद्धट भाषेत उत्तर दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय. काही वेळानं हा रिप्लाय डीलीट करण्यात आला. मात्र आता त्याचा स्क्रीनशॉट ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget