एक्स्प्लोर

MARD : मार्ड शिष्टमंडळाने घेतली महानगरपलिका अतिरिक्त आयुक्तांची भेट; निवासी डॉक्टरांची सुरक्षा, सोई-सुविधा आणि इतर मागण्यांवर चर्चा

Mumbai News : रूग्णालय परिसरात सुरक्षेशी संबंधित उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड नको अशा प्रकारच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिल्या. 

मुंबई : मेडिकल असोसिएशन ऑफ रेसिडन्ट डॉक्टर्स (मार्ड) संघटनेच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध  मागण्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांची  बैठक घेतली. याप्रसंगी शिष्टमंडळांने प्रामुख्याने कार्यक्षम सुरक्षा व्यवस्था, रहिवासी डॉक्टरांशी संबंधित सोयी सुविधा, सीसीटीव्ही यंत्रणा, विविध चाचण्यांच्या ठिकाणची रूग्णांच्या नातेवाईकांची गर्दी यासारख्या विषयांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.  शिष्टमंडळाने केलेल्या सुचना आणि मागण्यांबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली. तसेच शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर प्राधान्याने उपाययोजना करण्यात येतील, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बांगर यांनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले.   

रूग्णालय परिसरात नेमण्यात येणारी सुरक्षा व्यवस्था ही कार्यक्षम असावी. तसेच एखाद्या घटनेला किंवा प्रसंगाला प्रतिसाद देण्याच्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणेच्या सहभाग तत्पर व प्रसंगावधान दाखवणारा अपेक्षित आहे. एखादी घटना किंवा प्रसंग घडल्यानंतर सुरक्षा अधिकारी यांनी आपली भूमिका कशा पद्धतीने बचावली, या गोष्टीचे नियमित ऑडिट होणे गरजेचे आहे. एखाद्या घटना किंवा प्रसंगाला हाताळण्यासाठी सुनिश्चित कार्यपद्धती  (SOP) अंमलात आणणे गरजेचे आहे. सुरक्षा रक्षकांना कामाच्या ठिकाणी वेळोवेळी रोजच्या कामांमधून अद्ययावत स्वरूपाच्या प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे श्री. बांगर यांनी सांगितले. रूग्णांच्या सेवेला प्राधान्य देताना सुरक्षा रक्षकांसह कोणताही रूग्णालय कर्मचारी, डॉक्टर्स हे अरेरावी पद्धतीने वागणार नाहीत याचीही खातरजमा रूग्णालय प्रमुखांनी करावी. तसेच आवश्यक रूग्ण कक्षांमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध राहील याबाबतची पडताळणी करण्याच्या सूचना त्यांनी सुरक्षा विभागाला दिल्या. 

रूग्णालय परिसर हा पूर्ण सीसीटीव्ही निगराणीखाली असेल याबाबत रूग्णालय अधिष्ठातांनी स्वतः खातरजमा करून घ्यावी. तसेच संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्ष निर्माण करून तो हाताळण्यासाठी २४ तास व्यक्तींची नेमणूक करण्यात यावी, अशाही सूचना त्यांनी सुरक्षा विभागाला दिल्या. या सीसीटीव्ही कव्हरेजच्या स्टोरेज व अतिरिक्त बॅकअप वेगवेगळा राहील यासाठीची व्यवस्था करावी. रूग्णालय, कॅन्टीन, कॅम्पस, कॉमन रूम, हॉस्टेल कॅम्पस, हॉस्टेल कॉमन रुम आदी परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. बांगर यांनी प्रमुख सुरक्षा अधिकारी यांना दिल्या. 

रहिवासी डॉक्टर ऑनकॉल कर्तव्यावर असतात त्यावेळी त्यांना समर्पित खोली उपलब्ध असावी. डॉक्टरांच्या कामाचे स्वरूप पाहता त्याठिकाणी नियमित स्वच्छ स्वच्छतागृहांपासून सर्व सोयी-सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतील, यासाठीची जबाबदारी रूग्णालय प्रमुखांनी घ्यावी. तसेच डॉक्टरांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि समस्यांबाबत वेळोवेळी सूचना आणि प्रतिसाद घेण्यासाठीची व्यवस्था निर्माण करावी. हॉस्टेलच्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा चांगल्या दर्जाच्या राहतील, याअनुषंगाने नियमितपणे उपाययोजना करावी. तसेच नियमित बैठकांद्वारे चांगल्या संवादाने हे विषय मार्गी लावावेत, अशा सूचनाही श्री. बांगर यांनी दिल्या. येत्या दोन आठवड्यात मार्डच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागण्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. बांगर यांनी दिले. 

असे निदर्शनास आले आहे की, रुग्णांशी संबंधित नातेवाईकांना आया व वॉर्डबॉय यांचे काम सांगितले जाते. वास्तविक ही जबाबदारी आया व वॉर्डबॉय यांचीच आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आया व वॉर्डबॉय यांचे नियमित कर्तव्याचा भाग असलेले काम हे त्यांनीच पार पाडणे अपेक्षित आहे. कोणत्याही परिस्थितीत ही कामे रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितली जाऊ नये. तसेच रुग्णालयाच्या ठिकाणी अनुपस्थित राहणा-यांवर कडक कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. 
    
रूग्णालयात दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. रूग्णसेवांमध्ये गुणवत्तात्मक आणि परिणात्मक बदलाच्या माध्यमातून रूग्णांना दिलासा देणे हेच प्राधान्यस्थानी असणे गरजेचे आहे. तसेच रूग्णालयाच्या ठिकाणी योगदान देणाऱ्या डॉक्टरांना पुरविण्यात येणाऱ्या सेवासुविधाही दर्जेदार देण्यात याव्यात, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले.

आजच्या बैठकीला उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य)  संजय कुऱहाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रूग्णालय)  (श्रीमती) नीलम अंद्राडे, सर्व प्रमुख रूग्णालयाचे अधिष्ठाता तसेच प्रमुख सुरक्षा अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: तुमच्या घरात सुनेला जाच होतो वाटतं; उद्धव ठाकरेंना खाष्ट सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना किशोरी पेडणेकरांनी सुनावलं
अमितच्या बायकोशी शर्मिला ठाकरे खाष्ट सासूप्रमाणे वागतात का? किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर बोचरा वार
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC  : राज हे मोदी, शाह, फडणवीस या राज्याच्या शत्रूंना मदत करतायत, संजय राऊतांचा आरोपAnil Deshmukh Nagpur : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक; 4 जणांवर गुन्हा दाखलTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  11 AM :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaParinay Phuke on Anil Deshmukh : निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देशमुखांनी कुभांड रचलं - परिणय फुके

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: तुमच्या घरात सुनेला जाच होतो वाटतं; उद्धव ठाकरेंना खाष्ट सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना किशोरी पेडणेकरांनी सुनावलं
अमितच्या बायकोशी शर्मिला ठाकरे खाष्ट सासूप्रमाणे वागतात का? किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर बोचरा वार
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Embed widget