एक्स्प्लोर

एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना अटक

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना अटक केली आहे. ते न्यायालयीन कोठडीत असून आज त्यांच्या जामीनावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

ठाणे : राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याने मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना अटक करण्यात आली. शिवसेना कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली. मयुरेश कोटकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून आज त्यांच्या जामीनावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. मयुरेश कोटकर यांनी अनेक मालिकेत काम केलं आहे.

नवी मुंबई इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी आगरी समाजाने रस्त्यावर उतरुन मानवी साखळी तयार केली होती. या आंदोलनातही मयुरेश कोटकर यांचा समावेश होता. परंतु या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव देण्यात येईल. दुसऱ्या मोठ्या प्रकल्पला दि बा पाटील यांचं नाव दिलं जाईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. नामकरणाच्या या प्रकरणावरुन मयुरेश कोटकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मागील आठवड्यात शुक्रवारी (11 जून) सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती.

यासंदर्भात शिवसेनेकडून श्रीनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर मयुरेश कोटकर यांच्याविरोधात मानहानी, प्रक्षोभक भाषा आणि दोन गटांमध्ये वाद निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देणं याबाबत आयपीसीच्या विविध कलमांतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला. यावर कारवाई करत पोलिसांनी मयुरेश कोटकर यांना अटक केली. तसंच त्यांना संबंधित पोस्ट डिलीट करायला लावली. मयुरेश कोटकर यांना न्यायालयात हजर केलं असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या जामीनावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Embed widget