एक्स्प्लोर
...तर 1 ऑगस्टपासून जेलभरो आंदोलन: महामुंबई मराठा मोर्चाचा इशारा
खोटे गुन्हे मागे घ्या, लाठीचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, तसेच मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटीलांनी मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी करत, मराठा समाज महामुंबईनं सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
मुंबई: मराठा समाजाचं आंदोलन पुन्हा पेटण्याची चिन्हं आहेत. कारण सकल मराठा समाज महामुंबईच्या वतीने सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम देत, जेलभरोचा इशारा दिला आहे.
खोटे गुन्हे मागे घ्या, लाठीचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, तसेच मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटीलांनी मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी करत, मराठा समाज महामुंबईनं सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
दोन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास 1 आॉगस्टपासून जेलभरो आंदोलनाचा इशारा मराठा समाजाने दिला आहे.
सर्वपक्षीय बैठक
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आज विधानभवनात सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. मराठा आरक्षणाचा चिघळत चालणाऱ्या आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून होणार आहे.
अमित शाह मुंबईत
आजच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शाह विशेष विमानाने दिल्लीतून मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीपूर्वी अमित शाह आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यात बैठक झाली. मुंबईतील आरएसएस कार्यालय यशवंत भवन येथे ही बैठक झाली.
घटना बदला, आरक्षण द्या: शरद पवार
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी घटनेतच दुरुस्ती केली पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केलं. घटना दुरुस्तीसाठी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याची जबाबदारीही पार पाडण्याची तयारी पवारांनी दर्शवली आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी राज्य सरकारला पुन्हा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्र्यांच्या वारीत साप सोडण्याच्या विधानामुळेच मराठा समाजातील कार्यकर्ते आक्रमक झाले असं पवार म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली. चंद्रकांत पाटील यांच्या विधानांमुळेच राज्यातील आंदोलने भडकल्याची टीकाही शरद पवारांनी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement