व्हायरल मेसेज खरा ठरला, मराठा आंदोलकांची मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा'कडे कूच, पोलिसांकडून धरपकड
मुंबईत मराठा क्रांतीच्या मोर्चाला सुरुवात झाली असून त्यासाठी मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
Maratha Kranti Morcha Protest Updates: मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचा (Maratha Kranti Morcha) वतीनं मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन केलं जाणार असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झालेला. व्हायरल मेसेजचा पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मरिन ड्राईव्ह परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. आता हाच व्हायरल मेसेज खरा ठरला असून मराठा आंदोलक मोर्चासाठी गिरगाव चौपाटीवर एकत्र आलेत. गिरगाव चौपाटीपासून मोर्चाला सुरुवात झाली असून हा मोर्चा मुंख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या दिशेनं कूच करत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरही कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका मेसेजनं मुंबई पोलिसांची चिंता वाढवलेली. पण, हा व्हायरल मेसेज खरा ठरला असून मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र तर्फे आज मुंबईत धडक मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चाला सुरुवात झाली असून मोर्चानं थेट मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या दिशेनं कूच केली आहे. मोर्चा गिरगाव चौपाटीहून निघाला असून तो वर्षा बंगल्यावर जाणार आहे. त्यादरम्यानच्या रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या काय?
आरक्षण हे मराठा म्हणूनच पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे, कायद्यात टिकणारं पाहिजे या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून हे आंदोलन केलं जात असल्याचं आंदोलकांनी सांगितलं आहे. हा मोर्चा गिरगाव चौपटी शहिद तुकाराम ओंबळे स्मारकापासून सुरू झाला असून थेट मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यापर्यंत जाणार आहे. पण, या आंदोलनामुळे मराठा समाजात दोन मतं तर निर्माण झाली नाहीत ना? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
कारण काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवाली सराटी जालना येथे आमदरण उपोषण केलं होतं. मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण द्या, यासह इतर मागण्यांसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. पण आता मराठा क्रांती मोर्चानं मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्या, अशा मागणीसाठी आंदोलन छेडलं असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाकडे कूच केली. परंतु, पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवलं आणि त्याब्यात घेतलं.
मराठा आंदोलकांची धरपकड
गिरगावात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक एकत्र जमले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याकडे कूच केली. मात्र, गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला दरम्यानचा परिसर सायलेंट झोन असून पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, आंदोलकांशी चर्चेनंतर पोलिसांनी गिरगाव येथील शहीद तुकाराम ओंबळे चौक ते विविंग डेकपर्यंत मोर्चासाठी परवानगी दिली. आंदोलकांनी आपला मोर्चा सुरू केला. विविंग डेक परिसरात मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
पाहा व्हिडीओ :