एक्स्प्लोर
पैसे घेऊनही काम नाही, मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्याची धुलाई!
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्याने पैसे घेऊनही काम न केल्याने, त्याची मंत्रालयात जाऊन धुलाई करण्यात आली.
मुंबई: मंत्रालयातील खाबूगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्याने पैसे घेऊनही काम न केल्याने, त्याची मंत्रालयात जाऊन धुलाई करण्यात आली. उस्मानाबादच्या अरुण निटुरे यांनी शुक्रवारी दुपारी अधिकाऱ्याला मारहाण केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावर बडोले यांचं कार्यालय आहे. त्यांच्या दालनाशेजारील कक्षात पीए, पीएस, अधिकारी, कर्मचारी बसतात. अरुण निटुरे शुक्रवारी दुपारी उस्मानाबादवरुन आले होते. अरुण निटुरे एका आश्रमशाळेची मान्यता आणि एक आश्रमशाळा अनुदानावर आणण्याची प्रक्रिया करत आहेत. यासाठी ते तीन वर्षांपासून मंत्रालयात चकरा मारत आहेत. त्यासाठी त्यांनी अधिकाऱ्याला पैसेही दिल्याचा दावा केला आहे.
याच कामासाठी ते शुक्रवारी मंत्रालयात आले. बडोलेंच्या कार्यालयात त्यांनी ‘त्या’ अधिकाऱ्याची भेट घेतली. त्या अधिकाऱ्याला कामाची विचारणा केली. शिवाय कामासाठी पैसे दिले, इतके दिवस वाट पाहिली, पण तरीही काम का होत नाही, असं विचारलं.
त्यावर त्या अधिकाऱ्याने मी तुझा एक पैशाचा मिंधा नाही, असं म्हणताच, अरुण निटुरेंनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. पैसे घेऊनही मुजोरी करतोस, असं म्हणत अरुण निटुरेंनी मारहाण केली.
हा सर्व प्रकार घडला त्यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे पीएही उपस्थित होते. त्यांनी प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सर्व प्रकार होऊन गेला होता.
संबंधित बातम्या
मंत्री राजकुमार बडोलेंच्या पीएला 10 लाख दिले: अरुण निटुरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement