एक्स्प्लोर
मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीत सुधारणा
डिहायड्रेशन आणि कमी रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने रविवारी रात्री मुख्यमंत्र्यांना गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते.
गोवा : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा झाली असून आज किंवा उद्या त्यांना डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. आज सायंकाळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सुमारे अर्धा तास गोमेकॉमध्ये जाऊन पर्रिकर यांच्यावर सुरु असलेल्या उपचाराचा आढावा घेतला. मुख्य सचिव आनंद शर्मा यांनी देखील गोमेकॉला भेट देऊन पर्रिकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
डिहायड्रेशन आणि कमी रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने रविवारी रात्री मुख्यमंत्र्यांना गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. आज तिसऱ्या दिवशी देखील त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांचा डिहायड्रेशनचा त्रास आता आटोक्यात आला असल्याची माहिती सभापती सावंत यांनी दिली.
पर्रिकर यांच्या प्रकृती मध्ये चांगली सुधारणा होत असून आज किंवा उद्या त्यांना डिस्चार्ज मिळू शकेल अशी शक्यता सभापती सावंत यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आज सायंकाळी आरोग्यमंत्री राणे यांनी मुख्यमंत्री पर्रिकर यांची भेट घेतली. पर्रिकर यांच्या प्रकृती बद्दल विचारले असता राणे यांनी त्यावर भाष्य करणे टाळले. पर्रिकर यांना डिस्चार्ज केव्हा मिळेल हे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टरच ठरवतील असे राणे म्हणाले. राणे यांच्या पाठोपाठ मुख्य सचिव शर्मा यांनी देखील गोमेकॉला भेट देऊन पर्रिकर यांच्या प्रकृतीची पाहणी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement