एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Exclusive : मंजुळा शेट्येवर अनन्वित अत्याचार आणि मारहाण!
मुंबई : भायखळा जेलमधील कैदी मंजुळा शेट्येचा मृत्यू मारहाण आणि अनन्वित अत्याचारांमुळेच झाला, या आरोपाला आता बळ मिळालं आहे. कारण मंजुळा शेट्येच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत, असं शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे. मात्र मृत्यूचं नेमकं कारण अद्याप सांगण्यात आलेलं नाही.
मंजुळा शेट्येचा शवविच्छेदन अहवाल एबीपी माझाच्या हाती लागला आहे. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत, ज्यामुळे भायखळा तुरुंगातील महिला कैदी सुरक्षित आहेत का, असा सवाल निर्माण झाला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
भायखळा जेलमध्ये महिला कैद्याच्या मृत्यूपूर्वी तिच्यावर सहा महिला अधिकाऱ्यांकडून लैगिंक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, मंजुळा शेट्ये हिच्याकडून दोन अंडी आणि पाच पावांचा हिशेब लागत नसल्याचं निमित्त करून तिला मारहाण करण्यात आली. एका बॅरेकमध्ये मंजुळाला नग्न करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच तिचा लैंगिक छळही करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दुसरीकडे या जैलमधील कैदी इंद्राणी मुखर्जीनेही मंजुळा शेट्येवर अत्याचार करण्यात आल्याचं कोर्टासमोर सांगितलं होतं. मंजुळा शेट्येच्या हत्येपूर्वी तिच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले, असा गंभीर आरोप इंद्राणी मुखर्जीने जेल प्रशासनावर केला होता.
भायखळा जेलप्रशासनाविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या इंद्राणी मुखर्जीची सेशन कोर्टासमोर साक्ष नोंदवण्यात आली. मंजुळा शेट्येच्या हत्येपूर्वी तिच्यावर अनन्वित अत्याचार झाल्याचा आरोप इंद्राणीनं कोर्टासमोर केला आहे. गुप्तांगामध्ये रॉड टाकून मंजुळा शेट्येवर लैंगिक अत्याचार केल्याचं इंद्राणींनं कोर्टासमोर सांगितलं.
“भायखळा जेलमधल्या घटनेनंतर जेल प्रशासनाने महिला कैद्यांवर लाठीचार्जचे आदेश दिले होते. तेव्हा लाठीचार्जसाठी महिलांसह पुरुष स्टाफही सहभागी झाला होता.”, अशी माहितीही इंद्राणी मुखर्जीने कोर्टात दिली.
यावेळी इंद्राणीने आपल्या उजव्या हातावरील मारहाणीचे व्रणही कोर्टासमोर दाखवले. त्यानंतर, इंद्राणीला तक्रार दाखल करायची असल्यास संबंधित पोलिस स्टेशनला न्यावं, अशी कोर्टाने सूचना दिली होती.
संबंधित बातम्या : मंजुळा शेट्येंवर निर्भयासारखेच अत्याचार, इंद्राणी मुखर्जीचा गंभीर आरोप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement