एक्स्प्लोर
मंजुळा शेट्टये हत्या प्रकरण, सहा तुरूंग कर्मचाऱ्यांचं आरोपपत्रात नाव
मंजुळा शेट्टये हत्येप्रकरणी सहा तुरूंग कर्मचाऱ्यांचं आरोपपत्रात नाव आहे. मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आलं आहे. मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी पोलिसांनी अखेर आरोपपत्र दाखल केलं.

मुंबई : भायखळा कारागृहातील कैद्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी, पोलिसांनी अखेर आरोपपत्र दाखल केलं. 4 हजार पानी आरोपपत्रात कारागृह अधीक्षक मनिषा पोखरकरसह एकूण सहा कारागृह कर्मचाऱ्यांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. आरोपपत्र दाखल करताना भायखळा कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आलं. ज्यात मंजुळाचे केस पकडून तिला ओढून नेताना स्पष्ट दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपपत्रात इंद्राणी मुखर्जी आणि मरियम यांची साक्ष देखील महत्त्वाची मानण्यात आली. आता या प्रकरणातील आरोपींवरचे गुन्हे सिद्ध करण्यासाठी तपास यंत्रणा किती तत्परता दाखवते हे पाहावं लागेल. काय आहे नेमकं प्रकरण? भायखळा जेलमधील मंजुळे शेट्ये या महिलेचा शनिवार (24 जून 2017) मृत्यू झाला होता. अधिकाऱ्याच्या मारहाणीनंतर मंजुळे शेट्येचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
Exclusive : मंजुळा शेट्येवर अनन्वित अत्याचार आणि मारहाण!
महिला कैद्याच्या हत्येपूर्वी तिच्यावर सहा महिला अधिकाऱ्यांकडून लैगिंक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.मंजुळा शेट्ये हत्या: स्वाती साठेंचा व्हॉट्सअॅप मेसेज, आरोपींनाच पाठिंबा
मिळालेल्या माहितीनुसार, मंजुळा शेट्ये हिच्याकडून दोन अंडी व पाच पावांचा हिशेब लागत नसल्याचे निमित्त करुन तिला मारहाण करण्यात आली. एका बॅरेकमध्ये मंजुळाला नग्न करुन लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच तिचा लैंगिक छळही करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.आणखी वाचा























