एक्स्प्लोर
सीएसटीवर तरुणीकडे पाहून हस्तमैथुन करणारा अखेर अटकेत

मुंबई : मुंबईतील सीएसटी स्टेशनवर 29 जूनला ट्रेनमध्ये अश्लिल चाळे करणाऱ्या आरोपीला 10 दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली आहे. 20 वर्षीय अशोक प्रधान हा मूळचा भुवनेश्वरचा असून पोलिसांनी त्याला चेंबूरच्या माहूलगावहून अटक केली. सीएसटी स्टेशनवर नाशिकला जाण्यासाठी दोन तरूणी उभ्या होत्या. त्यावेळी एक तरुण या मुलींकडे पाहून हस्तमैथुन करत होता. याची माहिती तरुणींनी पोलिसांना दिली. मात्र, तरीही पोलिसांनी त्या तरुणाला सोडून दिलं. कुठलीही कारवाई केली नाही. या घटनेचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्या तरूणीनं 10 दिवसांपूर्वी व्हिडीओ रेल्वेला ट्वीट केला मात्र त्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अखेर 'माझा'च्या बातमीनंतर तरुणाला अटक करण्यात आली. नेमकं काय घडलं? एक तरुणी काही कामानिमित्त नाशिकला जात होती. यावेळी सीएसटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वर उभ्या असलेल्या तपोवन एक्स्प्रेसमध्ये एक तरुण तिच्याकडे रोखून पाहत हस्तमैथुन करताना तिला दिसला. सीएसटीवरुन ही ट्रेन सकाळी सव्वासहाला निघते. ती वेळेच्या आधीच तिथे पोहोचली होती. ट्रेन सुटायला काही मिनिटांचा अवधी असल्याने ट्रेनमधले दिवे बंद होते. तेव्हा अंधार आणि प्लॅटफॉर्मवर कोणी नाही हे पाहून या तरुणाने अश्लील चाळे करायला सुरुवात केली. इशा तिच्या मैत्रिणीची वाट बघत प्लॅटफॉर्मवरच उभी होती. तेव्हा तिला पाहताच या तरुणाने पँटची झिप उघडली आणि तिच्यादेखतच हस्तमैथुन करायला सुरुवात केली. या प्रकारामुळे घाबरलेली इशा दुसरीकडे जाऊन उभी राहिली. पण तिथेही तो तिच्या समोर असणाऱ्या बोगीत जाऊन उभा राहिला आणि अश्लील चाळे करु लागला. तिने त्याचा व्हिडिओही काढला. कदाचित आपल्याला आलेल्या वाईट अनुभवावर कोणी विश्वास ठेवणार नाही म्हणून पुरावा म्हणून तिने याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. ज्यावेळी तरुणी रेल्वे पोलिसांकडे तक्रार द्यायला गेली, त्यावेळी पोलिसांनी व्हिडिओ बघून तिची खिल्ली उडवली. एक पोलिस तिच्यासोबत आला, मात्र त्यानेही तरुणीलाच तिथून निघून जाण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत तो तरुण तिथून पळून गेला होता. एकप्रकारे रेल्वे पोलिसांनी त्याला सोडून दिल्यामुळे इशाने संताप व्यक्त केला आहे. गेल्याच आठवड्यात मुंबईतील लोकलमध्ये असाच प्रकार घडला होता. शेजारच्या कम्पार्टमेंटमधील महिलेकडे पाहून एक तरुण हस्तमैथुन करत असल्याचं समोर आलं होतं. संबंधित बातम्या : सीएसटीवर तरुणीकडे पाहून हस्तमैथुन, पोलिसांनी युवकाला सोडलं संबंधित व्हिडीओ : मुंबई : सीएसटी स्थानकात तरुणींसमोर अश्लील चाळे करणारा आरोपी अटकेत मुंबई : सीएसटी स्टेशनवर तरुणाचे अश्लील चाळे, 29 जूनची घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड करणाऱ्या तरुणीशी बातचीत मुंबई : सीएसटी रेल्वे स्थानकात महिला सुरक्षेचे धिंडवडे, मुलीकडे पाहून तरुणाचे हस्तमैथुन
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम























