एक्स्प्लोर

अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करा : अजित पवारांची विधानसभेत मागणी

अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडली.

मुंबई : अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडली. अंमली पदार्थांच्या व्यसनांमुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. काही ठरावीक देशांमधून येऊन इथे येऊन अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना आपल्या देशात येण्यास बंदी घाला, अशी मागणीदेखील पवार यांनी केली आहे. या विषयावर अजित पवार यांच्यासह इतरांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या दरम्यान पवार यांनी विविध मागण्या मांडल्या. राज्यात तरुणांमध्ये वाढत असलेली व्यसनाधिनता हा गंभीर विषय असून गेल्या वर्षी राज्यात 1000 कोटींपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज पकडण्यात आल्याचा मुद्दा अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडला. व्यसनांमुळे तरुण पिढी बरबाद होत असून घरातील पालक नोकरी करत असल्याने मुलांकडे लक्ष द्यायला कोणीही नसतं, हा मुद्दा उपस्थित करत ड्रग्जवर आळा घालण्याकरता कठोर तरतुदी केल्या पाहिजेत, अशी मागणी पवार यांनी केली. तसेच यासाठी राज्य सरकारने अधिकचा निधी द्यायला हवे, असेही त्यांनी सुचवले. दरम्यान, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी व्यसनाधीतेचे प्रमाण वाढत असल्याचे मान्य करत जिथे 2 वर्षांची शिक्षा आहे तिथे 10 वर्ष इतकी शिक्षा वाढवण्यात आली असून काही गुन्ह्यांसाठी असेलली 10 वर्षांची शिक्षा 20 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली असल्याचेही पाटील यांनी सांगितले. काही महाविद्यालंयांमध्ये किंवा आसपासच्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री होते, तिथे साध्या गणवेशातील पोलीस नेमले असल्याची माहिती पाटील यांनी दिली. असे प्रकार रोखण्यासाठी विशेष पोलिसांची पथके नेमण्यासंदर्भात पोलीस महासंचालकांना पत्र लिहिण्यात आले असून अशी विक्री करणारी दुकाने, पान टपऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan discharged from hospital : चेहऱ्यावर स्मित हास्त ठेवून सैफची घरात एंट्री #abpमाझाWalmik Karad CCTV : देशमुखांच्या हत्येआधी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये भेट, कराड उपस्थित; ऑफिसबाहेरुन Exclusive आढावाSaif Ali Khan Discharged : सैफ अली खानला डिस्चार्ज, Lilavati रुग्णालयातून घरी दाखल, EXCLUSIVE दृश्येSaif Ali Khan Discharge : व्हाईट शर्ट, डोळ्यांना गॉगल; ६ दिवस उपचार घेऊन सैफ घरी परतला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
Embed widget