एक्स्प्लोर
Advertisement
महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांचा महासागर
अंबरनाथ शहराची ओळख असलेलं हे शिवमंदिर तब्बल 958 वर्ष जुनं असून शिलाहार राजांनी हे मंदिर उभारलं होतं. दरवर्षी महाशिवरात्रीला या मंदिरात भाविकांचा महासागर दर्शनासाठी लोटतो.
अंबरनाथ : आज महाशिवरात्रीचा सण. फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्दशी दिनी हा सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. रात्री 12 वाजतापासून मंदिरात दर्शन सुरु झालं.
अंबरनाथ शहराची ओळख असलेलं हे शिवमंदिर तब्बल 958 वर्ष जुनं असून शिलाहार राजांनी हे मंदिर उभारलं होतं. दरवर्षी महाशिवरात्रीला या मंदिरात भाविकांचा महासागर दर्शनासाठी लोटतो. यंदाही रात्री 12 वाजता स्थानिक ग्रामस्थ आणि पारंपरिक पुजाऱ्यांच्या हस्ते मंदिरात अभिषेक आणि महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर दर्शनाची रांग खुली करण्यात आली.
यंदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाविकांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी इथे चार लाख भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. शिवाय मंदिर परिसरात अतिशय चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दुसरीकडे शिवदर्शनासाठी राज्यासह देशभरात भक्तांनी पहाटेपासूनच मंदिरात गर्दी केली आहे. मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरात शिवभक्तांनी बेल, फुले वाहून दुग्धाभिषेकही केला. तर उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यातील अखेरचं शाही स्नान आज महाशिवरात्रीदिनीच होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भविष्य
बॉलीवूड
Advertisement