एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उद्धव ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर बोलणार का?
शिवसेनेच्या दिवाकर रावतेंकडे परिवहन मंत्रीपद आहे. त्याचमुळे की काय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत चकार शब्दही काढलेला नाही.
मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी बसेस आगारात थांबून आहेत. तुटपुंज्या पगाराविरोधात एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत.
शिवसेनेच्या दिवाकर रावतेंकडे परिवहन मंत्रीपद आहे. त्याचमुळे की काय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत चकार शब्दही काढलेला नाही.
यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सरकारविरोधातील आंदोलनात सहभाग घेतला आहे. मग ते शेतकऱ्यांचं आंदोलन असो, महागाईविरोधातील आंदोलन असो किंवा नुकतंच झालेलं अंगणवाडी सेविकांचं आंदोलन, उद्धव ठाकरे यांनी सरकारविरोधात तातडीने प्रतिक्रिया दिल्या होत्या.
मात्र गेल्या तीन दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर असताना, दिवाळ सणात प्रवाशांचे प्रचंड हाल होत असताना, उद्धव ठाकरेंनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
एसटी कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याची मागणी केलीय. तर एसटी महामंडळानं 2 पूर्णांक 57 गुणोत्तरानुसार मूळ पगारावर केवळ चार हजाराची पगारवाढ देऊ असं म्हटलंय.
त्यामुळे हा तोडगा व्यवहार्य नसल्याचं म्हणत कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यास नकार दिलाय.
संबंधित बातम्या
अन्य राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार किती?
एसटी कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरुच
ST संपाविरोधात हायकोर्टात 2 याचिका, एकाच दिवशी सुनावणी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement