एक्स्प्लोर

‘महाराष्ट्र श्री’मध्ये मुंबईचीच ताकद दिसणार!

मुंबईत रविवारी रंगणाऱया ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत मुंबईचीच ताकद दिसणार आहे. शनिवारी झालेल्या प्राथमिक फेरीतून मुंबई आणि उपनगरचेच 20 पेक्षा अधिक खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

मुंबई : मुंबईत रविवारी रंगणाऱया ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत मुंबईचीच ताकद दिसणार आहे. शनिवारी झालेल्या प्राथमिक फेरीतून मुंबई आणि उपनगरचेच 20 पेक्षा अधिक खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. मात्र जेतेपदाच्या लढतीत सुनीत जाधवसमोर यंदा महेंद्र चव्हाण, अक्षय मोगरकर, रोहित शेट्टी, अजय नायर, सुजन पिळणकर अशा एकापेक्षा एक खेळाडूंचे जबरदस्त आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे सुनीतला सलग पाचव्यांदा महाराष्ट्र श्रीचा मान मिळविण्यासाठी आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. क्रीडाप्रेमी कृष्णा पारकर यांच्या पुढाकारामुळे अभिनव फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित महाराष्ट्र श्री स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत अनेक वर्षानंतर प्रथमच प्रचंड संघर्ष आणि अटीतटीची लढत पाहायला मिळाली. महाराष्ट्रातील तब्बल 190 खेळाडूंनी मुख्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला तर फिजीक स्पोर्ट्स प्रकारात 52 पुरूष तर 10 महिलांनी आपल्या फिटनेसचे स्फूर्तीदायक दर्शन घडवले. महाराष्ट्राच्या 22 जिह्यांमधून आलेल्या पीळदार खेळाडूंमुळे वांद्य्राच्या उत्तर भारतीय संघाची आज छाती अभिमानाने फुगली होती. प्राथमिक फेरीसाठी शेकडोच्या संख्येने खेळाडू जमा झाल्यामुळे सभागृहात जिकडे तिकडे आखीव रेखीव देहयष्टीचे खेळाडूच दिसत होते. पाच तासांच्या वजन तपासणीनंतर सुरू झालेल्या प्राथमिक फेरीत मोठ्या गटात महेंद्र चव्हाण, सचिन डोंगरे, अक्षय मोगरकर, अतुल आंब्रे यांची भव्य शरीरयष्टी पाहून महाराष्ट्र श्री साठी कडवा संघर्ष होणार हे दिसत होते. मात्र तेव्हाच महेंद्र पगडे या एका जबरदस्त खेळाडूची एण्ट्री पाहून महाराष्ट्र श्री किती थरारक असेल याची खरी कल्पना आली. सर्वात तगडा गट हा 95 किलोचा वजनी गट असून या गटात दोन महेंद्र एकमेकांशी भिडणार आहेत. यापैकीच एक हा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्ससाठी सुनीतशी मुकाबला करेल. 100 किलोवरील हेवीवेट गटात गतवर्षीचा मुंबई श्री अतुल आंब्रे हा अक्षय मोगरकरशी दोन हात करेल. चार वेळा महाराष्ट्र श्री ठरलेल्या सुनीत जाधवला गटात फारसे संघर्ष करावे लागणार नाही. त्याच्या गटात सचिन डोंगरे हा मुंबईचाच खेळाडू आहे. त्याचबरोबर सचिन वानखेडे आणि योगेश सिलबेरी हेसुद्धा चांगले खेळाडू या गटातून खेळणार असून सुनीतसमोर कुणाचेच आव्हान टिकणार नसल्याचे प्राथमिक फेरीतच स्पष्ट झाले. महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेवर मुंबईचाच दबदबा असणार हे पक्के झालं आहे. राज्यभरातून दोनशे पेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग असला तरी अंतिम फेरीसाठी सर्वाधिक खेळाडू मुंबई आणि उपनगरचेच पात्र ठरले असून दहा पैकी किमान पाच गटात मुंबईचे खेळाडू बाजी मारतील, असा विश्वास बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी बोलून दाखविला आहे. त्यामुळे अंतिम फेरीत मुंबईचेच वर्चस्व दिसणार हे स्पष्ट आहे. स्पर्धेच्या अन्य गटात खेळाडूंची संख्याही फार मोठी आहे आणि खेळाडूही चांगल्या तयारीत असल्यामुळे या गटांमधून सहा खेळाडूंची निवड करणे पंचांसाठी फार मोठे आव्हान असेल. 55 किलो वजनी गटात संदेश सकपाळला नितीन शिगवण आणि कल्पेश भोईरचे आव्हान असेल. 60 किलो वजनी गटात पुण्याच्या श्रीनिवास वास्केचे तगडे आव्हान आदित्य झगडे, प्रतिक पांचाळ आणि जगदीश कदम या मुंबईकरांनाच झेलावे लागणार आहे. 70 किलो वजनी गटात अमित सिंग, विघ्नेश पंडित या मुंबईकरांसह रविंद्र वंजारी(जळगाव), मनीष ससाणे (पुणे), श्रीनिवास खारवी (प.ठाणे) आणि जयेंद्र मयेकर (रायगड) हे दमदार खेळाडू आपल्या पीळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करतील. 75 किलो वजनीगटात अनिल बागवान (सातारा), सुशील मुरकर, स्वप्निल नेवाळकर, प्रेम शिंदे (ठाणे) यांपैकी कोण बाजी मारेल, हे सांगणे फार कठिण आहे. 80 किलो वजनीगटात सुयश पाटील,सुशांत रांजणकर यांना सागर कातुर्डेवर मात करण्यासाठी फार जोर लावावा लागणार असल्याचे दिसतं आहे. खरी मजा 85 किलो वजनी गटात असेल. या गटात मुंबई सुजय पिळणकरची गाठ ठाणे श्री अजय नायरशी असेल. या गटात सकिंदर सिंग, रोहित शेट्टी, रोहन धुरीसारखे दिग्गज असल्यामुळे हा गट प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणेच फेडेल. प्रत्येक गटात पीळदार संघर्ष होणार असल्याची ठिणगी प्राथमिक फेरीत पडलीच आहे. त्यामुळे रविवारी वांद्रे पूर्वेला शासकीय वसाहतीच्या पटांगणावर होणाऱया दिमाखदार सोहळ्यात क्रीडाप्रेमींना एक जबरदस्त थरार याची देही याची डोळा पाहायला मिळणार हे निश्चित. मात्र या सोहळ्याला ग्लॅमरस करण्यासाठी बॉलीवूडची स्टार मंडळीही हजेरी लावणार असल्यामुळे महाराष्ट्र श्रीचा सोहळा आणखीनच देखणा होणार असल्याचे आयोजक कृष्णा पारकर यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Neet Paper Leak Racket : नीट परीक्षा घोटाळ्यात रॅकेट कसं काम करायचं ?Sanjay Raut Full PC : कंगनाची मागणी हास्यास्पद;निकमांवर भाजपचा शिक्का; संजय राऊत काय काय म्हणाले ?ABP Majha Headlines :  11 AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune NCP Protest : ड्रग्ज प्रकरणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Maratha Kunbi Records: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
मोठी बातमी: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
Embed widget