एक्स्प्लोर

Monsoon Rain El NINO: महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडणार, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; के.एस. होसाळीकरांनी काय-काय सांगितलं?

Monsoon Rain El NINO: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी धडकी भरवणारं वर्ष, राज्यात सरासरीपेक्षा किती टक्के कमी पाऊस पडणार? शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी

Monsoon Rain El NINO: संपूर्ण देशात यंदा मान्सूनच्या काळात एल निनोचा प्रभाव असल्याने देशातील सरासरी पर्जन्यमान कमी राहील, असे भाकीत भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवले आहे. शुक्रवारी भारतीय हवामान खात्याने घेतलेल्या पत्रकार परिषदेत पावसाचा सुधारित अंदाज जाहीर केला. यापूर्वी एप्रिल महिन्यात हवामान खात्याने संपूर्ण देशात सरासरीच्या 92 टक्के पाऊस (Rain) पडेल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता यामध्ये सुधारणा करुन हवामान खात्याने देशात 90 टक्के पावसाचा (Monsoon) अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी महाराष्ट्रातील पर्जन्य स्थितीविषयी काही निरीक्षणे नोंदवली आहेत. (Maharashtra Weather news)

भारतीय हवामान खात्याने यापूर्वी दिलेल्या आपल्या पावसाच्या अंदाज घट केली आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी राहील. यंदाच्या मान्सूवर एल निनोचे सावट आहे. जून महिन्यात हा प्रभाव फार नसेल. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एल निनोचा प्रभाव सर्वसाधारण आणि सप्टेंबर महिन्यात तो सर्वाधिक असेल. याचा विपरीत परिणाम मान्सूनसवर होईल, असे के.एस. होसाळीकर यांनी सांगितले. 

चार महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेती, पिण्याचे पाणी, ऊर्जा आणि आरोग्य अशा सगळ्याच गोष्टींवर परिणाम होईल. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी असेल. पुढील वर्षभरात याचे प्रतिकूल परिणाम जाणवतील. याशिवाय, जून महिन्यात काही भागात उष्णतेच्या लाटा जाणवण्याची शक्यता आहे. जून महिना हा पावसाच्या संक्रमणाचा महिना आहे. 1 जूनला पाऊस केरळमध्ये दाखल झाल्यानंतर साधार 40 ते 45 दिवसांत राजस्थानपर्यंत पोहोचतो. मात्र, मान्सूनला उत्तरेकडे सरकायला उशीर झाला तर काही ठिकाणी उष्णतेचा प्रभाव जाणवतो. एल निनोची वर्ष ही नेहमीच उष्ण वर्ष म्हणून ओळखली जातात, असे के.एस. होसाळीकर यांनी म्हटले.

Rain Latest Updates: हवामान खात्याने 90 टक्के पाऊस म्हटलंय, पण अपुरा पाऊसही पडू शकतो: मयुरेश प्रभुणे

हवामान तज्ज्ञ मयुरेश प्रभुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवामान खात्याने 90 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यताही 60 टक्के इतकी वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याच्या निकषांनुसार 90 टक्के पाऊस हादेखील कमी मानला जातो. यंदा पावसाचे प्रमाण त्यापेक्षा कमी राहू शकते. त्यामुळे महाराष्ट्रात आणि देशात पावसाचे प्रमाण सरासरीच्या खाली राहण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात एल निनो फारसा सक्रिय नसला तरी जुलै-ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात एल निनोचा प्रभाव वाढत जाईल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ मयुरेश प्रभुणे यांनी दिली.

आणखी वाचा

Maharashtra Weather Update: मोठी बातमी : IMD च्या दुसऱ्या अंदाजाने धाकधूक वाढली, महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस, उष्णतेची लाट अधिक

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Uddhav Thackeray : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन

Embed widget