Sanjay Raut : 'आना ही पडेगा, चौपाटी में'; नरहरी झिरवाळांचा भन्नाट फोटो टाकत संजय राऊतांचं खोचक ट्वीट
Maharashtra Political Crisis Sanjay Raut Tweet : 'कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा.. चौपाटी में.. असं म्हणत संजय राऊतांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा फोटो टाकत ट्वीट केलं आहे.
Maharashtra Political Crisis Sanjay Raut Tweet : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा सहावा दिवस आहे. या दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत मात्र सकाळी उठल्याबरोबर एखादं ट्वीट करत आपल्या विरोधकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीयेत. आज देखील संजय राऊत यांनी सकाळी सकाळी एक भन्नाट ट्वीट केलं आहे. 'कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा.. चौपाटी में.. असं म्हणत त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा फोटो टाकत ट्वीट केलं आहे.
कब तक छीपोगे गोहातीमे..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 26, 2022
आना हि पडेगा.. चौपाटीमे.. pic.twitter.com/tu4HcBySSO
नरहरी झिरवाळ यांचा कमरेवर हात ठेवलेला हा भन्नाट फोटो त्यांनी पोस्ट केलाय. कधीपर्यंत गुवाहाटीत लपून बसणार आहात, चौपाटीवर म्हणजे मुंबईला यावंच लागेल, असा इशाराच या माध्यमातून संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे. या ट्वीटवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
माझा कट्ट्यावर संजय राऊतांचं सडेतोड भाष्य
काल संजय राऊत हे माझा कट्टा कार्यक्रमात आले होते. यावेळी बोलताना देखील त्यांनी बंडखोर आमदार आणि भाजपवर हल्लाबोल केला. राऊत यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचे आहे. हिंदुत्व या गोष्टी फक्त तोंडी लावायला आहे. मनाप्रमाणे गोष्टी घडाव्या म्हणून हे बंड करण्यात आले आहे. लालसा, महत्त्वकांक्षा, आमिष ही बंडाची सूत्र आहेत, असं ते म्हणाले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री न होण्यास भाजप जबाबदार
राऊत यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री न होण्यास भाजप जबाबदार आहे. 2019 साली भाजपला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते. त्यामुळे त्यांनी युती तोडली. ही गोष्ट एकनाथ शिंदेना माहित आहे. जर 2019 साली भाजपने रोखले नसते तर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंन मुख्यमंत्री केले असते.
बंडखोर मंत्र्यांची मंत्रीपदं 24 तासांमध्ये जाणार
बंडखोर मंत्र्यांची मंत्रीपदं 24 तासांमध्ये जातील असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिला. 16 आमदारांचं बंड ईडीच्या सुरु असलेल्या कारवाईमुळे आहे.
शिवसेनेने ज्यांना घडवले त्यांनी बंड केले
जे आमदार शिवसेनेतून निवडुन आले त्यांनी बंड केले. शिवसेनेने मेहनतीने या आमदारांना मोठे केले आहे. आज त्यांनी बंड केले. आज जे शिवसेनेच्या विचाराने निवडणूक लढवली. पुन्हा जनता या आमदारांना मतं देणार नाही
इतर महत्वाच्या बातम्या