एक्स्प्लोर

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार; शिंदे गटाचा पुढचा प्लॅन काय?

Eknath Shinde Shiv Sena MLA : एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे. गोव्यातून हे बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे. या बंडखोरांच्या स्वागतासाठी भाजपनं जय्यत तयारी केली आहे.

Maharashtra Political Crisis Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आलं. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे. शिंदे गट काल रात्री गोव्यातील ताज कन्व्हेंन्शन सेन्टर या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. गोव्यातून हे बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे. या बंडखोरांच्या स्वागतासाठी भाजपनं जय्यत तयारी केली आहे. दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे कडक सुरक्षाव्यवस्थेत शिंदे गटाची घरवापसी होणार आहे. महाराष्ट्रात वापसी झाल्यानंतर शिंदे गटाचा पुढचा प्लॅन काय असेल याकडं साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुरुवात झाली. शिवसेनेतील काही आमदारांसह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. एकापाठोपाठ एक आमदार आणि मंत्री एकथान शिंदेंच्या गटात सामील होऊ लागले. खरं तर तेव्हापासूनच महाविकास आघाडी सरकारचं काउंटडाऊन सुरु झालं होतं. भावनिक साद, आवाहन, अल्टिमेटम सर्व काही करुन झालं पण बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम होते. आरोप-प्रत्यारोपांची सत्र रंगली आणि अखेर या राजकीय नाट्यावर पडदा पडला तो म्हणजे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यामुळे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. 

शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे  यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळं राज्यात गेले दहा 10 दिवस राजकीय नाट्य पाहायला मिळालं. राज्यातील राजकीय भूकंपाचं केंद्र सूरत ते गोवा व्हाया गुवाहाटी असं सरकत गेलं आणि उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानं या राजकीय नाट्यावर पडदा पडला. 

शिंदे गटाला 6 कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पद

भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये भाजपच्या कोट्यात 18 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री पदासह 28 मंत्री असणार आहे. तर, शिंदे गटाला 6 कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  भाजप आणि एकनाथ शिंदे गटात झालेल्या चर्चेनुसार, दर 6 आमदारांमागदे एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीप पद दिले जाऊ शकते. मात्र, खाते वाटपाचे हे सूत्र अंतिम झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सहा आमदारांमागे एक मंत्री या सूत्रानुसार भाजपला फायदा होणार आहे. भाजपकडे या सूत्रानुसार 28  मंत्रीपदे मिळणार आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असल्याची माहिती समोर येत आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघांवर तिसऱ्या आघाडीचा डोळा; महायुतीतील इच्छुकांना हेरण्यासाठी जोरदार प्रयत्न
वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघांवर तिसऱ्या आघाडीचा डोळा; महायुतीतील इच्छुकांना हेरण्यासाठी जोरदार प्रयत्न
Dhangar Reservation : मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, सरकारला घरचा आहेर
मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, सरकारला घरचा आहेर
Sant Dnyaneshwar: राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
Savner Assembly Constituency: सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट
सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Charan Waghmare Bhandara : भाजपने काढल्यानंतर आमदार चरण वाघमारे महाविकास आघाडीच्या वाटेवर?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 28 Sepember 2024ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 28 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघांवर तिसऱ्या आघाडीचा डोळा; महायुतीतील इच्छुकांना हेरण्यासाठी जोरदार प्रयत्न
वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघांवर तिसऱ्या आघाडीचा डोळा; महायुतीतील इच्छुकांना हेरण्यासाठी जोरदार प्रयत्न
Dhangar Reservation : मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, सरकारला घरचा आहेर
मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, सरकारला घरचा आहेर
Sant Dnyaneshwar: राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
Savner Assembly Constituency: सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट
सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट
Maharashtra Assembly Election 2024 : 'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
Karvi Flower: कास पठार अवतरलं लोणावळ्यात! 7 वर्षांनी दिसणारं दुर्मीळ फूल पुण्यात, यंदा नाही पाहिली तर पुन्हा वाट पाहावी लागणार
कास पठार अवतरलं लोणावळ्यात! 7 वर्षांनी दिसणारं दुर्मीळ फूल पुण्यात, यंदा नाही पाहिली तर पुन्हा वाट पाहावी लागणार
Mumbai University Senate Election 2024: ठाकरेंच्या युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागा जिंकल्या; आदित्य ठाकरे म्हणाले...
युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागा जिंकल्या;आदित्य ठाकरे म्हणाले..
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Embed widget