(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डोंबिवली आणि कल्याण पूर्वच्या परिसराचा वीजपुरवठा उद्या सकाळपासून सायंकाळपर्यंत असणार बंद
डोंबिवली व कल्याण पूर्व भागातील काही भागाचा वीजपुरवठा सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत राहणार बंद आहे.
कल्याण - डोंबिवली : महावितरणकडून वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित देखभाल-दुरुस्तीसाठी डोंबिवली व कल्याण पूर्व भागातील काही भागाचा वीजपुरवठा बुधवारी (20 एप्रिल) बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधित भागातील वीज ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे
20 एप्रिल रोजी 'या' भागातील वीज पुरवठा सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत राहणार बंद
डोंबिवली पूर्व रामनगर फिडरवरील रामनगर पोलिस ठाणे, केळकर रोड, राजाजी रोड, क्रांती नगर, मद्रासी मंदिर, म्हात्रे नगर, नवीन आयरे रोड, आयरे गाव या भागात बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत वीजपुरवठा बंद असणार आहे.
20 एप्रिल रोजी 'या' भागातील वीज पुरवठा सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत राहणार बंद
कल्याण पूर्वमधील आजदे फिडरवरील आजदे, पाथर्ली, सागर्ली, एमआयडीसी कॉलनी, आजदेपाडा, जिमखाना रोड, शेलार नाका, इंदिरा नगर झोपडपट्टी, रेल्वे कॉलनी, त्रिमुर्ती नगर झोपडपट्टी भाग
डोंबिवलीमधील 'या' भागातील वीज पुरवठा सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत राहणार बंद
दत्तनगर फिडरवरील स्वामी शाळा, कॉमर्स प्लाझा, टिपटॉप कॉर्नर, जूना आयरे रोड, फाटकवाडी, दत्तनगर, संगितावाडी, दत्त चौक, शिवमंदिर रोड, डीएनसी कॉलेज, नांदिवली रोड, व तुकाराम नगर फिडरवरील आयरे रोड, तुकाराम नगर, सुदामवाडी, आयरे नगर, पाटकर शाळा
'या' भागातील वीज पुरवठा सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत राहणार बंद
22 केव्ही टेम्पो नाका फिडर व 22 केव्ही एमआयडीसी फिडर क्रमांक 11 वरील एमआयडीसी फेज दोनमधील अंशत: काही भागाचा वीजपुरवठा सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
देखभाल-दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण झाल्यास संबंधित भागातील वीजपुरवठा लवकर सुरू करण्यात येणार असून महावितरणच्या स्वंयचलित प्रणालीमार्फत संबंधित भागातील वीज ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे वीज बंदबाबत पूर्वकल्पना देण्यात आल्याची माहिती महावितरण कडून देण्यात आली आहे