एक्स्प्लोर

Sharad Pawar: आव्हाडांची कबुली, पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक झाली, पण...

Sharad Pawar On Patra Chawl Scam: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आपण चौकशीस तयार असल्याचे सांगत शरद पवार यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

Sharad Pawar On Patra Chawl Scam: सध्या चर्चेत असलेल्या पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Scam) प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली असताना राष्ट्रवादी काँग्रेसने हे आव्हान स्वीकारले आहे. शरद पवार यांनी चौकशीची तयारी दर्शवली असून सत्य बाहेर येईल असे म्हटले. भाजप सरकर काळात देशातील नागरिकांसमोरील प्रश्न बाजूला ठेवून अन्य पक्षाच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्याचा कार्यक्रम सुरू असल्याची टीका पवार यांनी केली. 

शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्यात अटक केली आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात पत्राचाळ प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यावरून भाजपने शरद पवारांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी जितेंद्र आव्हाडदेखील उपस्थित होते. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी होत असलेल्या आरोपांबाबत जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, शरद पवार यांनी  14 जानेवारी 2006 रोजी बैठक घेतली. या बैठकीत सर्व अधिकारी आणि संबंधित लोकं उपस्थित होते असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांनी बैठक घेतली यात नवल काय असा सवाल करत राज्यातील विविध प्रश्नी अनेक बैठका शरद पवार यांनी घेतल्या होत्या. चर्चा करुन संवाद साधणे आणि मध्य मार्ग काढणे हाच हेतू त्या बैठकीत होता. राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे तत्कालीन गृहनिर्माण विभागाचे सचिव होते. त्यांनी या बैठकीचे इतिवृत्त असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. या बैठकीत कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत सरकार निर्णय घेईल असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते. संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांचा असतो. तेच या प्रकरणात झाले असल्याचे आव्हाड यांनी म्हटले. या प्रकरणी चौकशी करावी. त्याला आमचा विरोध नाही. पण, भाजपकडून पराचा कावळा करण्यात येत आहे असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. 

भाजपचे आरोप काय?

मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरु आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळं मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : 'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू
Jackie Shroff : जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
मुंबई अत्याचार प्रकरण! आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही, शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीने लागू करणं गरजेचं : रोहित पवार
मुंबई अत्याचार प्रकरण! आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही, शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीने लागू करणं गरजेचं : रोहित पवार

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget