Maharashtra News Updates 10 November 2022 : केडीएमसीतील तीन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Nov 2022 08:41 PM
मुंबई - गोवा हायवेवरील पेणनजीक संशयास्पद वस्तू आढळल्याने खळबळ

मुंबई - गोवा हायवेवरील पेणनजीक संशयास्पद वस्तू आढळल्याने खळबळ 


पेणजवळील भोगावती पुलाच्या खालच्या बाजूला आढळली संशयास्पद वस्तू ... 


पेण पोलीस घटनास्थळी दाखल...

दिपाली सय्यद विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक आक्रमक


Pune news:  शिंदे गटात गेलेल्या दिपाली सय्यद यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक आक्रमक झाले आहे. पुण्यातील डेक्कन येथील गुडलक चौकात दिपाली सय्यद यांच्या विरोधात महिलांनी आंदोलन केलं. दिपाली सय्यद यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आलं. दिपाली सय्यद यांनी शिवसेना आणि रश्मी ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे महिला आघाडी आक्रमक झाल्याचं चित्र आहे. दिपाली सय्यद यांच्या विरोधात महिला शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

Sudhir Mungantiwar: 'जगदंब तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणणार'; सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

Sudhir Mungantiwar: जगदंब तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणणार,  छत्रपती शिवाजी महाराज यांची पुजेची तलवार ब्रिटनमधून जगदंब तलवार परत आणण्याच्या हालचालींना वेग वाढला आहे.  सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे. 2024 पर्यंत तलवार आणण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत, असंही सुधीर मुनगंटीवार  यांनी सांगितलं. 


 

दापोली कोर्टाची अनिल परब यांना नोटीस, विवादीत साई रिसॉर्ट प्रकरणी दाखल तक्रारीवरून कोर्टाची कारवाई

दापोली कोर्टाची अनिल परब यांना नोटीस, विवादीत साई रिसॉर्ट प्रकरणी दाखल तक्रारीवरून कोर्टाची कारवाई


बेकायदेशीर बांधकाम करून परब यांनी पर्यावरण संवर्धनाचे नियम पायदळी तुडवल्याबाबत खुलासा करण्याचे निर्देश

Eknath Shinde : केडीएमसीतील तीन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल

शिवसेनेत फूट पडल्यावर शिंदे गटात मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवकांनी प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात आजही जोरदार इनकमिंग सुरु आहे. कल्याण डोंबिवलीतील तीन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते पदाधिकार्यानी काल मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.


कल्याण ग्रामीणमधील माजी नगरसेविका पूजा म्हात्रे, कल्याण पश्चिमेतील माजी नगरसेवक गोरख जाधव, माजी नगरसेवक दत्ता गिरी यांच्यासह माजी नगरसेविका पूजा म्हात्रे यांचे पती आणि युवा पदाधिकारी योगेश म्हात्रे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदे यांच्या गटाला कल्याण डोंबिवलीतील 50 पेक्षा जास्त नगरसेवकांनी पाठिंबा देत त्यांच्या गटात सामिल झाल्याचे जाहीर केले होते. काल शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमधील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या

केडीएमसीतील तीन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल

शिवसेनेत फूट पडल्यावर शिंदे गटात मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवकांनी प्रवेश केला .शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात आजही जोरदार इनकमिंग सुरु आहे.कल्याण डोंबिवलीतील तीन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते पदाधिकार्यानी काल मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.


कल्याण ग्रामीणमधील माजी नगरसेविका पूजा म्हात्रे, कल्याण पश्चिमेतील माजी नगरसेवक गोरख जाधव,माजी नगरसेवक दत्ता गिरी यांच्यासह माजी नगरसेविका पूजा म्हात्रे यांचे पती आणि युवा पदाधिकारी योगेश म्हात्रे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदे यांच्या गटाला कल्याण डोंबिवलीतील 50 पेक्षा जास्त नगरसेवकांनी पाठिंबा देत त्यांच्या गटात सामिल झाल्याचे जाहिर केले होते. काल शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमधील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या जाहिर केल्या होत्या.

संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर उद्या सुनावणी

Sanjay Raut : वेळेअभावी संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होऊ शकली नाही. जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातली सुनावणी पुन्हा लांबणीवर

स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातली सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. पुढच्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. एक आठवड्यानंतर हे प्रकरण पटलावर घेऊ असं कोर्टाने म्हटलं आहे. अंदाजे 17 नोव्हेंबरला सुनावणीची शक्यता आहे. 

Beed News : आष्टीच्या तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी भव्य आक्रोश मोर्चा

Beed News : आष्टीचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली आष्टीच्या तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच नुकसान झाल आहे त्या पिकाचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी. त्याचबरोबर पिक विम्याची आग्रीम रक्कम देखील शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावी आणि शेतकऱ्यांचे शेतीपंपाचं वीज बिल माफ करावं यासह अन्य मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

Indapur News :  इंदापूर तालुक्यातील वडापुरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक फुगे यांची बदली

Indapur News :  इंदापूर तालुक्यातील वडापुरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक फुगे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्याकडील पदभार त्याच गावातील रहिवाशी असणारे नंदराज चंदनशिवे यांच्याकडे देण्यात आलाय. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी आदेश काढून देखील तत्कालीन ग्रामसेवक फुगे यांनी आपल्याकडील दप्तर गायकवाड यांना दिले नसल्याने ग्रामपंचायतचा कारभार दप्तराविना खोळंबला आहे. तात्काळ हे दप्तर गायकवाड यांना मिळावे म्हणून वडापूरी ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयास टाळा ठोकत आंदोलन केलयं. जोपर्यंत गायकवाड यांना दप्तर मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असल्याचं आंदोलक सदस्यांनी सांगितलयं.

Bacchu Kadu : अपंगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता, बच्चु कडुंनी केली होती मागणी

Bacchu Kadu : दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यासंदर्भात मान्यता दिल्याची माहिती बच्चू कडूंनी दिली.. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन व्हावं म्हणून बच्चू कडू अनेक वर्षांपासून संघर्ष करत होते. अखेर त्यांच्या लढ्याला आज यश आलंय. दरम्यान बच्चू कडूंनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लाडू वाटून निर्णयाचं स्वागत केलं. 

पक्षाच्या अभ्यासाठी वनविभागाचे कर्मचारी टिपेश्वर अभयारण्यात

सध्या राज्यात पक्षी सप्ताह सुरू आहे त्याचे औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्याच्या टिपेश्वर अभयारण्यात कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी वनविभागाचे अधिकारी आणि जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक डॉ रमजान विराणी यांनी प्रशिक्षणार्थ्यांना पांढऱ्या डोळ्यांचा बाज,  राखी डोक्याचा मत्स्य गरुड, मासेमार घुबड, जंगली धोबी,  या सारख्या 246  पक्षाच्या जाती बाबत  मार्गदर्शन केले. सोबतच निसर्गाच्या दृष्टीने पक्षांचे महत्त्व पटवून दिले. विशेष म्हणजे हे सगळे पक्षी टीपेश्वर अभयारण्यच्या पिलखान नाल्या शेजारीच आढळून  येतात. हे सगळे पक्षी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. टिपेश्वर अभयारण्य हे व्याघ्र प्रकल्प असून या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात जाती आणि प्रजातीच्या पक्षांची सुद्धा नोंद करण्यात आली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात कृषी पंपांना सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळात होणार वीज पुरवठा

मानव-वन्‍यजीव संघर्ष तसेच वन्यप्राण्यांच्या हल्‍ल्‍यात जाणारे नागरिकांचे बळी, त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास धास्तावलेला शेतकरी वर्ग ही परिस्थिती लक्षात घेता चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या मानव- वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात असलेल्या जिल्ह्यांमध्ये दिवसा होणारे कृषीपंपांचे विज भारनियमन रद्द करून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळात कृषीपंपांना सलग वीजपुरवठा करण्‍यात येईल, अशी घोषणा राज्‍याचे वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याशी सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चा केली आहे, उपमुख्‍यमंत्र्यांनी यासंबंधी तात्काळ सकारात्‍मक कार्यवाहीचे निर्देश ऊर्जा विभागाला दिले आहेत.

Pune News: राष्ट्रवादी पक्षाचे दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाहभाई यांच्यासह 8 जणांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा

Pune News: राष्ट्रवादी पक्षाचे दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाहभाई यांच्यासह आठजणांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दौंड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. महिलेचा विनयभंग करून केला म्हणून जाब विचारण्यास गेलेल्या तिघा जणांना तलवारी, कोयते घेऊन मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केली या कारणावरून दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह भाई शेख, इलास इस्माईल शेख, राशीद इस्माईल शेख, अरबाज सय्यद, वाहिद खान, जुम्मा शेख, वसीम शेख, जिलानी शेख व इतर दहा ते बारा जणांवर दौंड पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अधिनियम तीन एक नुसार ॲट्रॉसिटी व मारहाणीचा तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. 

राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवत आहेत : संजय राऊत

मी लवकरच देवेंद्र फडणवीसांना भेटणार : संजय राऊत

कारस्थान रचणाऱ्यांना आनंद मिळाला असेल तर मीही त्यात सहभागी, मी कुणावर टिप्पणी करणार नाही : संजय राऊत

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणार : संजय राऊत

103 दिवसांनी संजय राऊत लाईव्ह

नंदुरबार बाजार समितीत मक्याला विक्रमी 2899 रुपयांचा दर, गेल्या हंगामाच्या तुलनेत मक्याच्या दरात दुप्पट वाढ

Nandurbar News : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत सफेद मक्याला पतवारीनुसार 2462 ते 2899 पर्यंत दर मिळत आहे तर लाल मक्याला 1600 ते 2000 रुपयांचा दर मिळत आहे. बाजारसमितीत मक्याची आवक वाढली असून दररोज 3000 क्विंटलपेक्षा अधिक मका विक्रीसाठी दाखल होत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेने यावर्षी नंदुरबार बाजार समितीत लाल आणि सफेद मक्याला विक्रमी दर मिळत असून शेतकरी समाधानी आहेत. दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल मक्याची आवक बाजार समितीत होत असून ही आवक वाढण्याची शक्यता बाजार समितीच्या वतीने व्यक्त केली जात आहे. परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असे तरी यावर्षी मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. बाजार समितीत मका, सोयाबीन, ज्वारी, लाल मिरची तेजीत असून यातून शेतकऱ्यांना चांगले दर मिळत आहेत. मात्र बाजारपेठेत मक्याची आवक वाढण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. आवक वाढली तर काही अंशी दरात कमी जास्त होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

अधिकारी वर्गही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर नाराज, प्रलंबित प्रश्नांवर कार्यवाही न केल्याने असंतोषाची भावना, 15 नोव्हेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Mumbai News : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे अधिकारी वर्गही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर नाराज


दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर आश्वासनानुसार सरकारने अद्याप कार्यवाही न केल्याने राज्यभरातील सरकारी अधिकाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना 


काही मागण्यांबाबत अधिकारी वर्गाच्या महासंघाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करूनही अद्याप मागण्यांवर विचार केला जात नाही


त्यामुळे 15 नोव्हेंबरपर्यंत मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने  आंदोलनाचा इशारा  दिलाय.


राज्यात सुमारे दीड लाख राजपत्रित अधिकारी आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेचा शेतकऱ्यांना फटका, सांगलीतील 1 लाख शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान अडकले

Sangli Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सांगली जिल्ह्यातील 1 लाख शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान आचारसंहितेत अडकले आहे.  अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आता दोन महिने पैशांची वाट पाहावी लागणार आहे. आचारसंहितेत अनुदान अडकल्याने शासनाने होणाऱ्या विलंबानबद्दल व्याज देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

रत्नागिरीत 222 ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार; 18 डिसेंबरला मतदान, 20 डिसेंबरला मतमोजणी

Ratnagiri Gram Panchayat Election : रत्नागिरी जिल्ह्यात पुढील महिन्यात 222 ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्यामुळे या ग्रामपंचायतींवरती प्रशासक नेमण्यात आले होते. राज्यातील 7 हजार 675 ग्रामपंचायतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 222 ग्रामपंचायतीच्या समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांद्वारे 18 डिसेंबर रोजी मतदान तर निकाल 20 डिसेंबर रोजी होणार असल्याचे राज्य स्तरावरुन जाहीर करण्यात आले आहे. 

Satara News : अफझल खान कबरी भोवतीचं वादग्रस्त बांधकाम पाडणं सुरू

Satara News : छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारे सातारा जिल्ह्यातील प्रतापगड. या प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरी भोवतालच्या अतिक्रमणाबाबत जो काही वाद सुरू होता, त्यावर आज शिंदे सरकारकडून पडदा टाकण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. या अफजलखानाच्या कबरीभोवती जे काही अनधिकृत बांधकाम होतं, ते बांधकाम पोलीस, महसूल विभाग आणि वन विभाग यांच्याकडून ते पाडण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरात लावण्यात आलेला असून हा संपूर्ण परिसर पोलिसांनी सिल केला आहे. 

Anil Parab Granted Interim Bail : अनिल परब यांना अंतरिम जामीन मंजूर

Anil Parab Granted Interim Bail : दापोली तालुक्यातील मुरुड येथे साई रिसॉर्टचे बांधकाम अपूर्ण असताना कर आकारणीची कार्यवाही करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या माजी मंत्री, आमदार अनिल परब यांना खेड न्यायालयानं अंतरिम जामीन मंजूर केला आहे. 

Ratnagiri Gram Panchayat Election : रत्नागिरी जिल्ह्यात 222 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा उडणार धुरळा

Ratnagiri Gram Panchayat Election : ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्यामुळे या ग्रामपंचायतींवरती प्रशासक नेमण्यात आले होते.राज्यातील 7 हजार 675 ग्रामपंचायतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 222 ग्रामपंचायतीच्या समावेश आहे.या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांद्वारे 18 डिसेंबर रोजी मतदान तर निकाल 20 डिसेंबर रोजी होणार असल्याचे राज्य स्तरावरून जाहीर करण्यात आले आहे. 

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेचा आज राज्यात चौथा दिवस

Bharat Jodo Yatra : राज्यात तिसऱ्या दिवशीही भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही यात्रा कृष्नूर ते नांदेड मार्गक्रमण करत असताना बुधवारी राहुल गांधी यांनी शेतकरी, शेतमजूर, बचत गटांच्या महिला, विद्यार्थी यांची भेट घेऊन बातचीत केलीय. दरम्यान या सर्व यात्रेत कुटुंबासह सामील झालेले कोळी बांधवांचे कुटुंब लक्ष वेधून घेत होते. मुंबईहून भारत जोडो यात्रेत दाखल झालेले कोळी बांधवांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन आपल्या समस्या सांगतल्या. दरम्यान, आज या यात्रेचा चौथा दिवस आहे. राज्यातील भारत जोडो यात्रेच्या चौथ्या दिवशी राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार सहभागी होऊ शकतात. अशातच चौथ्या दिवशी कसा असेल या यात्रेचा संपूर्ण कार्यक्रम हे जाणून घेऊ. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Sanjay Raut News : संजय राऊतांच्या जामिनावरील स्थगितीच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी

Sanjay Raut News : तब्बल 100 दिवसानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची बुधुवारी (9 नोव्हेंबर) तुरुंगातून सुटका झाली. मात्र, या जामिनाला ईडीचा (ED) विरोध कायम आहे. या विरोधात ईडीने उच्च न्यायालयात अपिल केलं आहे. त्यावर न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत पीएमएलए कोर्टानं ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहे. दिवाणी खटल्यासाठी पीएमएलए कायदा लागू केला असल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत.

पार्श्वभूमी

संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती मिळावी अशी मागणी करणारी एक याचिका ईडीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली असून त्यावर आज सुनावणी होणार आहे. तसेच आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचा महाराष्ट्रातील चौथा दिवस असून त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते सामिल होणार आहेत. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत. 


संजय राऊतांच्या जामिनावरील स्थगितीच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी
संजय राऊत यांना जामीन मिळाला असला तरी त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका ईडीने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर आज सकाळी सुनावणी होणार आहे. ऑगस्ट 2022 रोजी संजय राऊतांना त्यांच्या निवास्थानातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर 102 दिवसांनी संजय राऊतांना पीएमएलए कोर्टाने जामिन मंजूर केला आहे.


राहुल गांधीच्या महाराष्ट्रातल्या पदयात्रेचा आज चौथा दिवस
राहुल गांधींनी सुरू केलेल्या पदयात्रेचा आज 64 वा आणि महाराष्ट्रातला आज चौथा दिवस आहे. सकाळी 6 वाजल्यापासून राहुल गांधी पदयात्रेला नांदेडच्या लोहा येथून सुरूवात करतील. दुपारी 4 वाजता देगलूर नाका येथून पुन्हा पदयात्रेला सुरूवात होईल. संध्याकाळी 6 वाजता न्यू मुंडा मैदान येथे राहुल गांधीची सभा होणार आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार आज यात्रेत सहभागी होणार आहेत.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
राज्यातील 92 नगरपरिषदांमध्येसुद्धा ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का? महानगरपालिकामधल्या प्रभाग पद्धतीच्या बदलांना मान्यता मिळणार का? या बाबतच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका नेमक्या कधी होणार याचे भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे. या प्रकरणाची सुनावणी आज नवे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर 21 व्या क्रमांकावर होणार आहे.


भारत- इंग्लंड सेमिफायनल सामना  
टी 20 विश्व चषकातला आज दुसरा सेमी फायनल सामना भारत आणि इग्लंड दरम्यान होणार आहे. आज जर भारत जिंकला तर विश्व चषकाच्या अंतिम फेरीत भारत पोहोचणार असून त्याचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.