एक्स्प्लोर

Mumbai Monsoon Update: मायानगरीला मान्सूनची कायमच प्रतीक्षा, 20 वर्षात कोणत्या तारखेला धडकला मुंबईत मान्सून?

Mumbai Monsoon Update:  गेल्या दोन दशकातील मान्सून आगमनाच्या तारखा पाहिल्या तर मुंबईत मान्सून हा सरासरी 10 जूनपर्यंत मुंबईत दाखल होतो. 

Mumbai Monsoon Update:  मान्सून केरळात (Monsoon Keralal) दाखल झाला असला तरी महाराष्ट्रात त्याचं कधी आगमन होईल, याबाबत अनिश्चितता आहे.  तरीही 15 ते 17 जूनच्या दरम्यान मान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होऊ शकते, असा अंदाज आहे. मान्सून  केरळात दाखल झाला की  मुंबईमध्ये कधी येणार असे वाक्य दरवर्षी आपल्या कानावर पडते. या ही वर्षी मान्सून रखडणार उशीरा दाखल होणार अशी माहिती समोर येत आहे. तसा आत्तापर्यंतचा मुंबईतील मान्सूनचा इतिहास पाहिला तर मान्सूनचे आगमन मुंबईत कधीच वेळेत झाले नाही. गेल्या दोन दशकातील मान्सून आगमनाच्या तारखा पाहिल्या तर मुंबईत मान्सून हा सरासरी 10 जूनपर्यंत मुंबईत दाखल होतो. 

केरळात मान्सून (K दाखल झाल्यानंतर  कधी  चक्रीवदळचा (Cyclone) अडथळा तर कधी  कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सून रखडतो. हे सगळे पार झाल्यानंतर मान्सून जरी कोकणात दाखल झाला तरी मुंबईकरांना मात्र वाट पाहावी लागते.त्यामुळे मुंबईत मान्सून हा आतापर्यंत कधीच जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल झालेला नाही. गेल्या 20 वर्षातील मुंबईतील मान्सून  आगमनच्या तारखावर नजर मारल्यास मान्सून हा 2006 साली सर्वात लवकर म्हणजे 31 मे रोजी दाखल झाला होता. सर्वात उशीरा मान्सून 2019 साली  26 जून रोजी दाखल झाला आहे.  

 केरळ आणि मुंबईत दाखल झालेला मान्सूनच्या तारखा 

वर्ष केरळ मुंबई
2001 23 मे 9 जून
2002 29 मे 12 जून
2003 8 जून 16 जून
2004 18 मे 10 जून
2005 5 जून 19 जून
2006 26 मे 31 मे
2007 28 मे 18 जून
2008 31 मे 7 जून
2009 23 मे 21 जून
2010 31 मे 11 जून
2011 29 मे 5 जून
2012 5 जून 17 जून
2013 1 जून 8 जून
2014 6 जून 12 जून
2015 5 जून 8 जून
2016 8 जून 20 जून
2017 30 मे 10 जून
2018 29 मे 9 जून
2019 8 जून 25 जून
2020 1 जून 25 जून
2021 3 जून 9 जून
2022 29 मे 11 जून
2023 8 जून अद्याप आलेला नाही

पावसाचा प्रवास कधी अंदमान, कधी केरळ असा रेंगाळतो तर कधी पश्चिम किनारपट्टीवरून पुढे सरकणारी पावसाची शाखा रखडते.  दरम्यान पूर्व किनारपट्टीवरून कधी पाऊस त्याचा  प्रवास सुरू ठेवतो आणि आंध्र - विदर्भातून  राज्यात  दाखल होतो.  मुंबई मात्र मान्सूनची कायमच प्रतीक्षा करते. 

उन्हाच्या तडाख्यापासून सुटका मिळण्याची वाट पाहत आहेत. एकीकडे केरळमध्ये पाऊस पोहोचला आहे. पण, मुंबईसह राज्यातील काही भागांत अजूनही उन्हाचा फटका बसत आहे. त्यामुळे सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

हे ही वाचा:

Monsoon 2023: आनंदवार्ता... मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मान्सून केरळात दाखल, भारतीय हवामान विभागाची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Video | उद्धव ठाकरे हरामखोर कुणाला म्हणाले? राम कदम यांची प्रतिक्रियाUddhav Thackeray : हरामखोर आहेत ते...उद्धव ठाकरेंचारोख कुणावर? पाहा संपूर्ण व्हिडीओ ABP MAJHAMaharashtra Superfast : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 26 March 2025 : 5 PMABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
Embed widget