पुढील काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरु होणार; विजय वडेट्टीवारांचं ट्वीट
सध्या मुंबई लोकल बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रवाशांच्या प्रश्नाला उत्तर देताना लोकल सुरु होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे गेल्या आठ महिन्यांपासून मुंबईची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन बंद आहे. सध्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसह इतर काही लोकांनाच मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशातच लोकल लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी सर्वच स्तरांमधून केली जात आहे. आता सर्वांसाठी मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय येत्या काही दिवसांत घेण्यात येईल, असं ट्वीट मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. एका प्रवाशाच्या प्रश्नाला उत्तर देताना वडेट्टीवारांनी ट्वीट केलं आहे.
Dear Sir @CMOMaharashtra @OfficeofUT
Earlier Women allowed to travel in Mumbai Locals. Now Lawyers allowed too. Why disallow businessmen employees common man❓ Its BIG INJUSTICE to block @mumbairailusers in Diwali season.@PiyushGoyal @AUThackeray @VijayWadettiwar @DrSEShinde pic.twitter.com/TeaiOEe3Qd — M. K. Ludhwani (@m_ludhwani) October 27, 2020
प्रवाशाचं ट्वीट :
एका प्रवाशाने ट्वीट करत म्हटलं होतं की, "याआधी महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली, आता वकिलांनाही देण्यात आली. मग व्यावसायिक, कर्मचारी आणि सामान्य माणसांना का नाही? दिवाळी सणात प्रवास नाकारणं खूप मोठा अन्याय आहे."
We will take decision on starting local train services for all in the next couple of days. We have held discussions with various stakeholders. Mumbaikar will get relief on this soon
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 27, 2020
विजय वडेट्टीवार यांचं उत्तर :
प्रवाशाच्या प्रश्नाला उत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट केलं की, 'पुढील काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेऊ. यासंबंधी चर्चा झाली असून मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल.'
सध्या मुंबई लोकल बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच लोकल लवकरात लवकर सुरु करावी यासाठी अनेक स्तरांतून मागणी केली जात आहे. त्यामुळे सरकार मुंबई लोकलसंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन, लोकल सर्वांसाठी कधी सुरु करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच वडेट्टीवारांनी प्रवाशाच्या ट्वीटला दिलेलं उत्तर हे लोकल लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत असल्याचं बोललं जात आहे.
पाहा व्हिडीओ : येत्या काही दिवसांत सर्वांना लोकलने प्रवास करता येणार : विजय वडेट्टीवार
महिला आणि वकीलांपाठोपाठ शिक्षकांसाठीही लोकल सुरु
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबतच शिक्षकांनाही लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अर्थात ही परवानगी नॉन पीक अवर्स म्हणजेच, गर्दीच्या वेळी व्यतिरिक्त उरलेल्या वेळेत प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :