(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Local : मध्य रेल्वेवर उद्या पाच तासांचा मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण दरम्यान मुख्य मार्गावर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल / गोरेगाव विभागांमधील हार्बर मार्गावर कोणताही मेगाब्लॉक असणार नाही.
मुंबई : मध्य रेल्वेकडून (Central Railway) रविवारी (1 मे) सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 या वेळेत ठाणे आणि ऐरोली स्थानकांदरम्यान मेट्रोचे आरएच गर्डर्स टाकण्याचे काम ट्रान्सहार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात करणार आहे.
डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे येथून सकाळी 10.20 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेल करीता सुटणारी आणि पनवेल/नेरुळ/वाशी येथून सकाळी 9.48 ते सायंकाळी 4.19 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण दरम्यान मुख्य मार्गावर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल / गोरेगाव विभागांमधील हार्बर मार्गावर कोणताही मेगाब्लॉक असणार नाही.
अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रशासनाकडून दिलगीर व्यक्त करण्यात आली आहे. उद्या असणाऱ्या मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था करण्याचं आवाहन करण्यात आलंय.